________________
६२
गुरु-शिष्य
करीत नाहीत.' अरे, माझी शक्ती तुम्ही कशाला शोधता? तुमची शक्ती हवी. या सगळ्यांना मी सांगितले आहे की, 'माझ्यात शक्ती हवी. तुमच्या शक्तीची गरज नाही.' बाहेर तर सगळीकडे असेच आहे ! गुरू बनून बसला असेल तर त्याच्याजवळ त्याची स्वत:ची शक्ती हवी. पण हे तर लोकांवरच लादतात. की, 'तुम्ही काही करीत नाही!' अरे बाबा, मी करू शकलो असतो तर तुमच्याजवळ कशासाठी आलो असतो? येथे कशाला धडपडलो असतो?' या कलियुगातील लोकांना समजत नसल्यामुळे हे सगळे वादळ सुरु आहे. नाही तर माझ्यासारखे तर उत्तर देतीलच ना? गुरू चोख (शुद्ध) असतील तर आम्हाला अवश्य प्राप्ती होतेच. आणि नाही झाली तर गुरुंमध्येच पोल (पोकळपणा) आहे. हो, खरोखरच पोल आहे, हे मी तुम्हाला सांगतो!!
पोलचा अर्थ मी काय सांगू इच्छितो? की गुरू एकांतात बिडी ओढत असतील तर तुमची बिडी सुटणार नाही. नाही तर का सुटणार नाही? एक्जेक्टली झालेच पाहिजे. पूर्वी सगळ्या गुरूंचा हा रिवाजच होता. गुरू म्हणजे काय? की स्वतः सगळ्या गोष्टींचे पालन करतात. म्हणून समोरच्यांकडून सुद्धा सहजच पालन होऊ शकते. हे तुमच्या लक्षात येते का?
प्रश्नकर्ता : गुरू पालन करतात म्हणून आपल्याकडूनही पालन होते. हे माझ्या बुद्धीत उतरत नाही.
दादाश्री : मग तर त्यापेक्षा पुस्तके बरी. पुस्तके असेच सांगतात ना? 'असे करा, तसे करा, अमके करा.' तर या जिवंत गुरूंपेक्षा तर पुस्तके बरी. जिवंताच्या तर असे पाया पडावे लागते!
प्रश्नकर्ता : पण त्यामुळे नम्रतेचा अभ्यास होतो ना?
दादाश्री : त्या नम्रतेचे काय करायचे? जिथे आपल्याला काही प्राप्ती होत नाही, मग आयुष्यभर जरी तिथेच राहिलो तरी सुद्धा आपले कपडे भिजणार नाहीत, तर ते पाणी आपल्या काय कामाचे? म्हणून हे सगळे व्यर्थ, वेस्ट ऑफ टाईम अँड एनर्जी ! (वेळ व शक्तीचा अपव्यय आहे.)