________________
गुरु-शिष्य
नाही तर खऱ्या गुरूशिष्यामध्ये तर प्रेमाचे बंधन इतके सुंदर असते की गुरू जे बोलतील, ते त्याला खूप आवडते. असे तर प्रेमाचे बंधन असते. पण आता तर या दोघांची भांडणेच चालू असतात. गुरू म्हणतील, 'असे कर, मी तुला सांगतोय?' पण शिष्य करीतच नाही. म्हणजे तिथे तर दिवसभर सासु-सुनेच्या कटकटीच्या भांडणांसारखे गुरू-शिष्यांमध्येही भांडणे आहेत. शिष्याच्याही मनात असे येते की, 'इथून पळून जाऊ?' पण पळून जाईल तरी कुठे बिचारा? घरातून तर पळाला, घरची अब्रू तर घालवली, आता कुठे जाईल? त्याला ठेवणार तरी कोण? नोकरीवर सुद्धा कोणी ठेवणार नाही. आता यात काय करु शकतो? गुरूंचेही माहात्म्य राहिले नाही, आणि शिष्याचेही महात्म्य राहिले नाही, आणि पूर्ण धर्मही बदनाम झाला!!
शिष्याजवळ हवा फक्त विनय कित्येक ठिकाणी गुरूंच्या आधारावरच शिष्य असतात. शिष्यांची संपूर्ण चिंता त्या गुरूंच्या डोक्यावर असते. अशा त-हेने शिष्यांचा व्यवहार चालत राहतो. दुनियेत काही खरे गुरूही असतात, गुरूंच्या डोक्यावर काही शिष्यांचे ओझे असते आणि गुरू जे करतील ते ठीक. म्हणून शिष्यांवर जबाबदारी नाही आणि शांती राहते. कुठला तरी आधार तर हवाच ना! निराधार मनुष्य जगू शकत नाही.
प्रश्नकर्ता : तर मग तिथे शिष्याला काहीच करण्याची गरज नाही?
दादाश्री : शिष्य तर, तो बिचारा काय करू शकेल! तो जर करू शकत असता तर मग गुरूंची आवश्यकताच राहिली नसती ना? शिष्याकडून काही सुद्धा होऊ शकत नाही, तो तर गुरूकृपेमुळेच पुढची प्रगती करत राहतो. मनुष्य स्वतः काहीच करू शकत नाही.
प्रश्नकर्ता : गुरूची कृपा हवी, पण शिष्याला सुद्धा करावे तर लागतेच ना?
दादाश्री : काहीच करायचे नसते, फक्त विनय बाळगला पाहिजे. या जगात करण्यासारखे आहे तरी काय? विनय बाळगावा. दुसरे काय