________________
गुरु-शिष्य
शिष्याला कितीही येत असेल, पण हे गुरू सगळे असेच भेटतात ना! कलियुगातील गुरू कसे असतात? शिष्य म्हणतो की, 'मी तर अज्ञानी आहे, मी काही जाणत नाही' तरी सुद्धा गुरू त्या बिचाऱ्याला मारत राहतात, पुढची प्रगती करू देत नाहीत. मरेपर्यंत गुरू त्याला चुकाच दाखवत राहतात आणि पुष्कळ छळतात, हैराणच करुन टाकतात. तरी सुद्धा शिष्याला सांभाळणारेही काही गुरू असतात. पण शेवटी गुरू म्हणजे दारूखानाच समजा, कधी ना कधी फुटल्याशिवाय राहणारच नाही.
या काळात शिष्यांची सहनशक्ती नाही, आणि गुरुंमध्ये तशी उदारताही नाही. गुरुंमध्ये तर पुष्कळ उदारता असावी, अतिशय उदार मन असावे. शिष्यांचे सर्व निभावून घेण्याची उदारता असायला हवी.
धर्म असा बदनाम झाला शिष्याने शिव्या दिल्या तरीही समता राखतो त्याला गुरू म्हणतात. शिष्य तर निर्बळ असतोच, पण गुरू निर्बळ असतील का? तुम्हाला काय वाटते? गुरू निर्बळ नसणारच ना! कधी शिष्याकडून चूक झाली, तो जर काही उलट-सुलट बोलला तर गुरू फणा काढतात, मग शिष्य तरी कसा आज्ञेत राहील? शिष्याकडून जरी चूक झाली पण गुरूंनी चूक केली नाही तेव्हाच तो शिष्य आज्ञेत राहू शकतो. गुरूंकडूनच चूक झाली, तर शिष्य कसा आज्ञेत राहील? गुरूची एक जरी चूक पाहिली ना तरी, शिष्य आज्ञेत राहणार नाही. पण तरी सुद्धा गुरूंच्या आज्ञेत राहिला की मग कल्याणच झाले!
सगळीकडेच स्वछंदी झाले आहेत. शिष्य गुरूंना मानत नाहीत आणि गुरू शिष्याला मानत नाही! शिष्य मनात विचार करेल की, 'गरूंना जरा अक्कल कमी आहे. म्हणून आम्ही आमच्या परीने वेगळ्या प्रकारे विचार करु. गुरू तर सांगतील, पण आम्ही तसे करू तर ना! म्हणजे हे सर्व असे झाले आहे. गुरू शिष्याला सांगतील की, 'असे कर' तेव्हा शिष्य तोंडावर 'हो' म्हणतो पण नंतर करतो काही तरी वेगळेच. इतका अधिक स्वछंद चालू आहे. कोणी एका शब्दाचेही योग्य प्रकारे पालन केले नाही. मग शिष्य म्हणेल, 'गुरू तर बोलतील, जरा चक्रमच आहेत.' म्हणजे हे सर्व असे चालत असते.