________________
अहिंसा
८७
तर कोणाच्याही हातात नाही. पण तरी असे बोलू नये. बोलाल तर जोखीम येईल. बाहेर सगळ्यांसमोर बोलू नये. समजदार व्यक्तीलाच सांगू शकतो. म्हणून वीतरागांनी सर्वच उघड केले नाही. बाकी, द्रव्यहिंसा कोणाच्याच हातात नाही, कोणत्याही जीवाच्या ताब्यात नाही. पण जर असे सांगण्यात आले ना, तर लोक पुढच्या जन्म बिघडवतील. कारण भाव केल्याशिवाय राहणारच नाहीत ना! म्हणतील 'हे तर आपल्या हातातच नाही, मग आता मारण्यात काही दोषच नाही ना!' ही भावहिंसाच बंद करायची आहे. म्हणजे वीतरागी किती समंजस! या बाबतीत एक अक्षर सुद्धा लिहिले आहे का? पाहा ना, थोडे तरी लिकेज होऊ दिले का! तीर्थंकर किती समंजस पुरुष होते, जिथे पाऊल ठेवतील तिथे तीर्थ!
पण तरी द्रव्यहिंसा बंद केली तरच भावहिंसा थांबेल असे आहे. तरी पण भावहिंसेची मुख्य किंमत आहे. म्हणजे भगवंताने असे जीवांच्या 'हिंसे-अहिंसेत' पडण्याचे सांगितले नाही. भगवंत तर सांगतात की, 'तू भावहिंसा करू नकोस. मग तू अहिंसक ठरशील.' इतकेच भगवंतानी सांगितले आहे.
अशी होते भाव अहिंसा म्हणजे सर्वात मोठी हिंसा भगवंताने कशास म्हटली? की 'या माणसांनी एखाद्या जीवाला मारून टाकले, त्यास आम्ही हिंसा म्हणत नाही. पण या माणसांनी जीवाला मारण्याचे भाव केले, म्हणून आम्ही त्यास हिंसा म्हटली आहे.' बोला आता, लोक काय समजतात? की 'याने जीवाला मारून टाकले, म्हणून यालाच पकडा.' तेव्हा कोणी म्हणेल, 'याने जीवाला मारले तर नाही ना?' मारले नसेल त्यासही हरकत नाही. पण याने भाव तर केला ना की, जीव मारले पाहिजेत. म्हणून तोच गुन्हेगार आहे. आणि जीवाला तर 'व्यवस्थित' शक्ती मारते. तो तर फक्त अहंकारच करतो की 'मी मारले.' आणि जो भाव करतो तो तर स्वतः मारतो.