________________
८६
अहिंसा
भाव स्वतंत्र, द्रव्य परतंत्र प्रश्नकर्ता : ते काहीही असो पण त्यांच्याकडून अहिंसा तर झालीच ना!
दादाश्री : भाव ही स्वतंत्र हिंसा आहे. आणि द्रव्य ही परतंत्र हिंसा आहे. ती स्वत:च्या ताब्यात नाही. म्हणजे हे परतंत्र अहिंसा पाळतात. हा त्यांचा आजचा पुरुषार्थ नाही.
म्हणजे ही जी अहिंसा आहे ती स्थूल जीवांसाठीची अहिंसा आहे. पण ती चुकीची नाही. जेव्हा की भगवंताने काय सांगितले की, ही अहिंसा तुम्ही बाहेर पाळता, ती पूर्णपणे अहिंसा पाळा, सूक्ष्म जीव किंवा स्थूल जीव सगळ्यांसाठी अहिंसा पाळा. पण तुमच्या आत्म्याची भावहिंसा होणार नाही हे प्रथम पाहा. आणि ही तर निरंतर भावहिंसाच होत राहिली आहे. आता लोक तोंडाने तर भावहिंसा बोलतात, पण ही भावहिंसा कशास म्हणतात, हे समजून घेतले पाहिजे ना? माझ्याशी चर्चा केली तर मी त्यांना समजावेल.
भावहिंसा तर कोणालाही दिसत नाही आणि या चित्रपटासारखी, म्हणजे जसा चित्रपट चालतो ना, आणि आपण तो बघत असतो, अशी दिसते ती सर्व द्रव्यहिंसा आहे. भावहिंसेत असे सूक्ष्मरूपात होत असते आणि द्रव्यहिंसा तर दिसते. प्रत्यक्ष मन, वचन, कायेने या जगात जे दिसते, ती द्रव्यहिंसा आहे.
बचाव करा, प्रथम भावहिंसेपासून म्हणजे भगवंताने अहिंसा वेगळ्या प्रकारची सांगितली की, फर्स्ट अहिंसा कोणती? ती म्हणजे आत्मघात होऊ नये. प्रथम आतून भावहिंसा होणार नाही हेच पाहायला सांगितले. त्याऐवजी हे तर कुठल्याकुठेच पोहोचले. ही तर सगळी भावहिंसाच होत आहे, निरंतर भावहिंसा होत आहे. म्हणून सुरुवातीला भावहिंसा बंद करायची आहे. आणि द्रव्यहिंसा