________________
अहिंसा
हिंसा करतात. त्या हिंसेपेक्षा ही हिंसा खूप खराब आहे, दिवसभर आत्म्याचीच हिंसा करत राहतात. याला भावहिंसा म्हणतात.
प्रश्नकर्ता : हे लोक तर स्वत:च्या आत्म्याचीच हिंसा करतात, पण ते (वेस्टर्नचे) लोक तर दुसऱ्यांच्या आत्म्याची हिंसा करतात.
दादाश्री : नाही. हे लोक तर सगळ्यांच्याच आत्म्याची हिंसा करतात. जो कोणी भेटतो त्या सगळ्यांचीच हिंसा करतात. यांचा धंदाच उलटा आहे. म्हणून तर ते (वेस्टर्नचे) लोक सुखी आहेत ना! दुसरे, म्हणजे त्यांना दुसऱ्यांना दुःख देण्याचा विचार देखील येत नाही. आणि 'आय वील हेल्प यु, आय वील हेल्प यु' (मी तुम्हाला मदत करेल) असे सांगतात. आणि आपल्या इथे तर स्वार्थ ठेवतात, 'माझा फायदा होत असेल' तर मदत करणार, नाही तर नाही करणार. आधी हिशोब काढून बघतात की माझा फायदा होईल का! असा हिशोब काढतात की नाही काढत?
म्हणूनच भगवंताने भावहिंसेला खूप मोठी हिंसा म्हटली आहे आणि हा पूर्ण हिंदुस्तान भावहिंसाच करुन राहिले आहे.
प्रश्नकर्ता : परंतु इथे (हिंदुस्तानात) तर अहिंसेला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे.
दादाश्री : पण तरी सुद्धा सर्वात जास्त हिंसा इथल्या लोकांची आहे. कारण दिवसभर कटकट, कटकट आणि कटकटच करत राहतात. याचे काय कारण? तर येथील लोक जास्त जागृत आहेत. तरी सुद्धा आजची जी मुले उलट मार्गावर वळली आहेत, त्यांना अशी जास्त भावहिंसा नाही बिचाऱ्यांना! कारण ते मांसाहार आणि व्यसन वगैरे करतात, म्हणून जडसारखे होऊन गेले आहेत. जडात जास्त भावहिंसा नसते. बाकी, अधिक जागृत असतात तिथे निव्वळ भावहिंसाच असते. म्हणूनच दिवसभर कटकट, कटकट... ग्लास फूटला तरी कटकट! काही झाले तरी कटकट!