________________
अहिंसा
नाही. भगवंताच्या भाषेचे हे ज्ञान तर जो 'शुद्धात्मा' झाला आहे त्यानेच जाण्यासारखे आहे. दुसऱ्यांनी हे ज्ञान जाण्यासारखे नाही. दुसऱ्या लोकांसाठी हे पॉइजन (विष) आहे.
भारतात भावहिंसा खूप
प्रश्नकर्ता : अहिंसेचा व्यापक प्रचार करण्यासाठी खूप वेळ लागेल ?
८४
दादाश्री : खूप वेळ लागला तरी देखील पूर्ण प्रचार होऊ शकणार नाही. कारण संसार म्हणजे काय ? हिंसात्मक मनोवृतीच आहे. म्हणून ते जमणार नाही. हे तर हिंदुस्तानात लोक थोडीफार अहिंसा पाळण्यास तयार होतात, बाकी इतर लोक तर अहिंसेला समजतच नाही ना !
प्रश्नकर्ता : पण जीवांना वाचवणे, यामागे सूक्ष्म अहिंसेचा भाव आहे का ?
दादाश्री : वाचवणे म्हणजे सूक्ष्म नाही, ही तर स्थूल अहिंसा आहे. सूक्ष्म तर त्यांना समजणारच नाही. सूक्ष्म अहिंसा कशी समजतील ? या लोकांना अजून स्थूलच समजत नाही, मग सूक्ष्म कशी समजेल ? आणि ही स्थूल अहिंसा तर त्यांच्या रक्तातच आहे ना, म्हणूनच अशा लहान प्रकारच्या जीवांची अहिंसा पाळतात. बाकी, हे सर्व लोक स्वतःच्या घरात दिवसभर हिंसाच करत राहतात, सगळेच, फक्त काही अपवाद सोडले तर !
प्रश्नकर्ता : या वेस्टर्न कंट्रिजमध्ये पण निरंतर हिंसाच करत राहतात. खाण्यात-पिण्यात, प्रत्येक कामात. घरात सुद्धा हिंसा. माश्या मारणे, मच्छर मारणे, बाहेर लॉनमध्येही हिंसा, औषध फवारणे, जीवजंतु मारणे, बाग-बगीचात पण हिंसा, मग ते लोक कसे सुटतील ?
दादाश्री : अरे, त्यांच्या हिंसेपेक्षा हे हिंदुस्तानातील लोक जास्त