________________
अहिंसा
एखाद्या ठिकाणी हजारो माणसे कापली गेली असतील हे महावीर भगवंतांना समजले, तरी महावीर भगवंतावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. कारण त्यांना माहीत आहे की कोणी मरतच नाही. लोकांना असेच वाटते की मरत आहे, खरोखर मरत नाही. हे जे दिसते ती सर्व भ्रांती आहे. मला कधीही कोणी मरताना दिसलेच नाही ना! तुम्हाला दिसते, म्हणून तुम्हाला तेवढी शंका वाटत राहते. की, 'काय होईल, काय होईल?' तेव्हा मी म्हणेल की, 'भाऊ काहीही होणार नाही. तू माझ्या आज्ञेत रहा.'
म्हणजे आज मी खूप सूक्ष्म गोष्ट सांगून टाकली की भगवंताच्या भाषेत कोणी मरतच नाही. पण तरी लोकांनी भगवंताला सांगितले की, 'भगवंत, हे ज्ञान आज उघडच करा ना!' तेव्हा भगवंताने सांगितले, 'नाही, ते उघडपणे सांगता येईल असे नाही. मग तर लोक असेच समजतील की कोणी मरतच नाही. म्हणून ते कोणालाही खाऊन टाकण्याचा भाव करतील, भाव बिघडवतील.' लोकांचे भाव बिघडतील म्हणूनच भगवंतानी हे ज्ञान उघड केले नाही. अज्ञानी लोकांना भाव बिघडवायला वेळच लागत नाही, आणि भाव बिघडले म्हणजे तो 'स्वतः' तसाच होऊन जातो. कारण जे आहे ते स्वतःच आहे, त्याचा कोणी उपरी (वरिष्ठच) नाहीच.
म्हणून जोपर्यंत भ्रांति आहे तोपर्यंत असे बोलूच नये की भगवंताच्या भाषेत कोणी मरत नाही. हे तर तुम्ही नेमके तेच विचारले म्हणून मला हे रहस्य उलगडावे लागले. त्यातही आपल्या 'महात्म्यां' समोर हे सांगण्यास हरकत नाही. हे 'महात्मा' दुरुपयोग करणारे नाहीत. तुम्ही 'भगवंताच्या भाषेत कोणी मरत नाही' असे तिथे सगळ्यांसमोरही सांगाल का?
प्रश्नकर्ता : मला कोणाची भीती नाही. मी तर हिमतीने सांगेल. दादाश्री : नका सांगू. हे ज्ञान सगळ्यांसमोर उघड करण्यासारखे