________________
अहिंसा
त्याने जसा भाव केला असेल त्या भावानुसारच त्याचा हिशोब येत असतो. परंतु मरणकाळ आल्याशिवाय कोणाकडून मरत नाही.
म्हणजे यात कोणते वाक्य समजायचे आहे? की जोपर्यंत त्या जीवाचा मृत्यूकाळ आलेला नसेल तोपर्यंत त्याला कोणी मारू शकतच नाही. आणि मृत्यूकाळ कोणाच्याही हातात नाही.
___नाही 'मरत' कोणी भगवंताच्या भाषेत
प्रश्नकर्ता : पण हिंसा न करणे हा दैवीगुण आहे की नाही? म्हणजे हिंसा करणे हा गुन्हा आहे की नाही?
दादाश्री : मी तुम्हाला गुपीत उघड करून सांगू?! या सर्वांच्या समोर सांगू, इथे कोणी दुरुपयोग करेल असे नाही म्हणून सांगतो.
या जगात भगवंताच्या दृष्टीने कोणी मरतच नाही. भगवंताच्या भाषेत कोणी मरत नाही, लोकभाषेत मरतात. या भ्रांतीच्या भाषेत मरतात. ही गोष्ट उघडपणे सांगितली. मी असे कधीच बोललो नाही. आज तुमच्या समक्ष बोलतो.
भगवंताच्या ज्ञानात जे वर्तत आहे ते माझ्या ज्ञानात वर्तत आहे, आणि ते असे आहे की या जगात कोणी जिवंतही नाही आणि कोणी मेलाही नाही. आत्तापर्यंत हे जग चालत आले आहे तेव्हापासून कोणी मेलाच नाही. जो मरताना दिसतो ती भ्रांतीच आहे आणि जन्म घेताना दिसतो ती सुद्धा भ्रांतीच आहे. ही भगवंताच्या भाषेतली वास्तविकता मी तुम्हाला उघडपणे सांगितली. आता तुम्हाला जुन्या गोष्टींना धरून बसायचे असेल तर धरून बसा आणि नसेल धरायचे तर नव्याला धरुन ठेवा. ही आमची गोष्ट समजली का तुम्हाला?
प्रश्नकर्ता : गोष्ट समजली, पण तुम्ही खूप मोघममध्ये सांगितली. दादाश्री : हो, म्हणजे भगवंताच्या भाषेत कोणी मरत नाही. समजा