________________
अहिंसा
८१
निघाले आणि ते (सोने) गौतमस्वामींनी सर्व सूत्रांवर चढवले. आता जेव्हा कोणी गौतमस्वामी सारखे असतील तेव्हा पुन्हा त्या सूत्रांमधून सोने काढतील. पण ते गौतमस्वामींसारखे येतील केव्हा आणि सोने निघेल केव्हा आणि आपले कल्याण होईल केव्हा?
'मारायचे नाही' हा निश्चय करा आता बऱ्याच लोकांनी निश्चय केला की 'आपल्याला नावालाही हिंसा करायची नाही. कोणत्याही जीवजंतुला मारायचे नाही.' असा निश्चय केला असेल तर मग त्याच्याकडे मरण्यासाठी कोणी जीवजंतु चुकूनही येत नाही. त्याच्या पायाखाली आले तरीही ते वाचते व निघून जाते. आणि 'मला जीवांना मारायचेच आहे' असा ज्याने निश्चय केला आहे, तिथे मरण्यासाठी सर्व तयार आहेत.
बाकी, भगवंताने सांगितले आहे की, या जगात कुठलाही मनुष्य कुठल्याही जीवाला मारू शकतच नाही. तेव्हा कोणी म्हणेल,' हे भगवंत, तुम्ही असे का बोलता? आम्ही तर मारताना बघत असतो ना सगळ्यांना!' तेव्हा भगवंत म्हणतात, 'नाही, त्याने मारण्याचा भाव केला आहे आणि या जीवाचा मरणकाळ जवळ येत आहे. म्हणजे जेव्हा याचा मरणकाळ येतो तेव्हा त्याचा योग जुळून येतो, ज्याने मारण्याचा भाव केला आहे त्याला येऊन मिळतो. बाकी मारू शकतच नाही. पण मरणकाळ येतो म्हणून मरतो आणि तेव्हाच तो भेटतो. ही गोष्ट खूप सूक्ष्म आहे. आज जर हे जगाला समजले असते ना, तर जग आश्चर्यचकितच झाले असते!
प्रश्नकर्ता : ट्रेनमध्ये अॅक्सिडन्ट होतो आणि ट्रेन खाली माणूस मरून जातो. तर यात ट्रेनने कुठे निश्चय केला आहे?
दादाश्री : ट्रेनला निश्चयाची गरजच नसते. हे तर ज्यांचा मृत्युकाळ जवळ येतो ना, तेव्हा तो म्हणेल की, 'आपण वाटेल त्याप्रकारे मरू.' तर 'त्याची पर्वाच नाही' असे भाव असतील तर त्याला तसे मरण येईल.