________________
अहिंसा
करीत आहेस. बाहेरचा तर तो जेव्हा मरणार असेल तेव्हा मरेल. त्याची वेळ येईल, त्याचा योग जुळून येईल आणि ते तर सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहेत. कितीतरी संयोग एकत्र येतात आणि ते डोळ्यांनी दिसत नाहीत असे एविडन्स एकत्र येतात तेव्हा तो जीव मरतो. आणि त्याला वाटते की 'मी त्याला मारले' 'अरे, तुझी मारण्याची इच्छा तर नाही मग तू त्याला कसे मारले?' तेव्हा म्हणतो, 'पण माझा पाय त्याच्यावर पडला ना!' 'अरे, तुझा पाय? तुझ्या पायाला लखवा नाही होणार?' तेव्हा म्हणे, ‘पक्षाघात तर पायाला होतो.' मग तो पाय तुझा नाही. तुझ्या वस्तूला लखवा होत नाही. तू तुझ्या पायावर मालकीपणा करतोस पण ती चुकीची मालकी आहे. कोणी ज्ञानी पुरुषाला विचारून तर ये की हे माझे आहे की परके आहे ? असे विचार ना! विचारशील तर ज्ञानीपुरुष तुला समजावतील की भाऊ, हे सर्व तुझे नाही. हा पाय सुद्धा परका, हे दुसरे सर्व सुद्धा परके आणि हे तुझे. अशा प्रकारे ज्ञानी पुरुष तुला स्पष्टीकरण देतील. ज्ञानीपुरुषांकडून 'सर्वे' करवून घे. हा तर लोकांकडून 'सर्वे' करवून घेतो. पण हे सर्वे करणारेच वेडे आहेत. ते तर परक्या वस्तूलाच माझी मानतात. म्हणजे खरा 'सर्वे' झालेलाच नाही. ज्ञानी पुरुष सर्वे' करून वेगळे करुन देतात. आणि लाईन ऑफ डिमार्केशन (भेदरेखा) आखून देतात की हा इतका भाग तुमचा, आणि हा इतका परका. जे कधीच आपले होत नाही, त्यास म्हणतात परके. कितीही डोकेफोड केली तरीही ते आपले होत नाही.
आता मरणकाळ कोणाच्याही हातात नाही. परंतु देवाने हे उघड केले नाही की यामागे कॉजेस (कारणे) आहेत. काही ज्ञान असे आहेत की ते उघड केले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे देवाने जर ही गोष्ट सविस्तरपणे सांगितली असती तर लोकांना नीट समजले असते. तरी पण देवाने ही गोष्ट सांगितली आहे पण लोक समजले नाहीत. देवाने सगळीच स्पष्टता केली आहे. पण ते सर्व सूत्रांमध्ये आहे. त्या लाख सूत्रांना विरघळवले तर इतकेसे विरघळेल. भगवंत जे बोलले ते सोन्याच्या रुपात