________________
अहिंसा
व्यवहार मात्र आहे. हे करेक्ट नाही. आणि रियलमध्ये काय आहे ? कोणताही जीव कोणत्याही जीवाला मारू शकतच नाही. मारण्यासाठी तर सर्व सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स एकत्र होतात तेव्हाच तो मरतो. कुणी एकटा मनुष्य स्वतंत्रपणे असे मारु शकत नाही. आता जर एविडन्स एकत्र आले तरच मरेल, आणि एविडन्स आपल्या हातात नाहीत. म्हणून कोणताही जीव कोणत्याही जीवाला वाचवू शकतच नाही. जर सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स असतील तरच वाचेल. नाही तर वाचत नाही. हा तर फक्त वाचवण्याचा अहंकार करतो. पण त्याचबरोबर असेही सांगितले की मला मारायचे आहे असा भाव तू मनातून काढून टाक. कारण भाव एक एविडन्स आहे. म्हणून हा एविडन्स आणि दुसरे एविडन्स एकत्र आले तर कार्य होऊन जाईल. म्हणजे त्यातील 'वन ऑफ द एविडन्स' 'स्वत:चा' भाव आहे. त्यामुळे सगळ्याच एविडन्सचा 'स्वतः' इगोइजम करतो.
मरणकाळातच मरण हे तर आम्ही अति सूक्ष्म गोष्ट सांगू इच्छितो की कोणत्याही जीवाला त्याचा मरणकाळ आल्याशिवाय कोणी मारू शकत नाही. समजा आता सात बोकड असतील, तर त्यातील तो दोन बोकड विकतो, ज्याचा मरणकाळ आलेला असतो त्यालाच विकतो. अरे, त्या सातातून हे दोन तुला प्रिय नव्हते? ते पण चांगलेच आहेत बिचारे, मग तू त्यांना का विकतोस? आणि बोकड सुद्धा खुश होऊन त्याच्यासोबत जाते. कारण मरणकाळ जवळ आला म्हणून! मग त्याला तिथे खाटिकखान्यात रंगवतात-सजवतात, तेव्हा तो खुश होतो. त्याला वाटते दिवाळीच आली. असे हे जग आहे. पण हे सर्व समजण्यासारखे आहे.
अर्थात कोणाचा मरणकाळ आल्याशिवाय बाहेर कोणी मरत नाही. पण तू मारण्याचा भाव केला म्हणून तुला भावहिंसा लागते. आणि ती तुझ्या आत्म्याचीच हिंसा होत राहिली आहे. तू तुझी स्वत:चीच हिंसा