________________
७८
अहिंसा
दसरे काही नाही. आत्मा काही असा मरत नाही, पण हा तर स्वतः स्वत:चीच हिंसा करत आहे. या कारणाने देवाने मनाई केली आहे. आणि तू वाचवशील तर तू खोटा अहंकार करत आहेस. ती सुद्धा तू आत्मभावाची हिंसाच करत आहेस. म्हणजे हे दोघेही चुकीचे करतात. तेव्हा सोड ना ही झंझट! बाकी, कोणी कोणाला मारू शकतच नाही. पण देवाने जर असे स्पष्ट सांगितले असते की मारू शकतच नाही, तर लोकांनी अहंकार केला असता की मी मारले! अशी कोणातही शक्ती नाही. बिनशक्तीचे हे जग आहे. उगाच विकल्प करून भटकतच राहतात. ज्ञानींनी हे पाहिले आहे की, हे जग कशाप्रकारे चालत आहे. म्हणजे हे सर्व चुकीचे विकल्प घुसले आहेत, तिथे मग निर्विकल्प कसे होऊ शकतील?
हे जे सर्व जीव आहेत ना, ते कोणी कोणाला मारू शकतच नाहीत. मारण्याची शक्ती कोणातही नाही. तरी सुद्धा देवाने सांगितले की हिंसेला सोडून अहिंसेच्या मार्गावर या. ते काय म्हणतात की मारण्याचा अहंकार सोडा. दुसरे काही सोडायचे नाही, मारण्याचा अहंकार सोडायचा आहे. तुम्ही मारल्याने मरत नाही, मग उगाच अहंकार कशासाठी करता? अहंकार केल्याने तर उलट जाळयात जास्त फसाल, भयंकर जोखीम ओढवून घ्याल. त्या जीवाला त्याच्या निमित्ताने मरू द्या ना! तो मरणारच आहे, मग तुम्ही कशाला अहंकार करता? अर्थात अहंकार बंद करण्यासाठी देवाने अहिंसेची प्रेरणा दिली. मारण्याचा जो अहंकार आहे तो सोडवण्यासाठी हे सर्व सांगितले.
प्रश्नकर्ता : इतके ज्ञान पचवणे हे सामान्य माणसासाठी जरा जास्तच आहे असे नाही का म्हटले जाणार?
दादाश्री : नाही, ते पचेल असे नाही. म्हणून तर उघड केले नाही. सगळ्यांना असेच सांगितले की तुम्ही वाचवा. नाही तर ते मरतील.
मारण्या-वाचवण्याचे गुप्त रहस्य आता 'याने जीव मारला, याने असे केले, याने वाचवले' हे सर्व