________________
अहिंसा
७७
असे वेगळे-वेगळे सांगतात. यात कोणाचा मोक्ष होईल?' तेव्हा संत म्हणाले, 'यात मोक्षाची गोष्ट करण्याचे उरलेच कुठे? एक दारू न पिण्याचा अहंकार करत आहे, मांसाहार न खाण्याचा अहंकार करत आहे. आणि दुसरा दारू पिण्याचा अहंकार करत आहे, मांसाहार खाण्याचा अहंकार करत आहे. यात मोक्षाची गोष्टच कुठे आहे ? मोक्षाची गोष्ट तर वेगळीच आहे. तिथे तर निरअहंकारी भाव पाहिजे.' हे तर दोघेही अहंकारी आहेत. एक या खड्ड्यात पडला आहे दुसरा त्या खड्ड्यात पडला आहे. देव तर दोघांना अहंकारी म्हणतात.
फक्त अहिंसेच्या पुजाऱ्यांसाठीच लोक जे मानतात तसे देवाने नाही सांगितलेले नाही. देव, तर खूप समंजस पुरुष! देवाने असे सांगितले की या जगात असा कोणीही नाही की, जो कोणाला मारू शकेल. कारण की, सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहेत. मग कसे मारू शकेल? कितीतरी संयोग एकत्र येतात तेव्हा तो मरतो! आणि त्याचबरोबर असेही सांगितले की, ही पूर्णपणे गुप्त ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा कोणी म्हणेल, 'साहेब, तुम्ही असेही सांगता आणि तसेही सांगता?' तेव्हा देव म्हणतात, 'हे पाहा, ही गोष्ट शहाण्या माणसांसाठी आहे, जे अहिंसेचे पुजारी आहेत त्यांच्यासाठी हे वाक्य सांगत आहोत. आणि जे हिंसेचे पुजारी आहेत त्यांच्यासाठी हे सांगत नाही. नाही तर ते भावना करतील की मला यांना मारून टाकायचे आहे. म्हणजे या जन्मात तर असे होणार नाही पण अशी भावना केल्यामुळे पुढील जन्मात त्याचे फळ येईल.' तेव्हा ही गोष्ट कोणाजवळ करायची आहे ? तर अहिंसेच्या पुजाऱ्यांजवळ ही गोष्ट करण्याचे सांगितले आहे.
___ 'हे' सर्वांसाठी नाही देवाने सांगितले की मारण्याचा अहंकार करू नकोस, आणि वाचवण्याचा अहंकारही करू नकोस. तू मारशील तर तुझा आत्मभाव मरेल, बाहेर कोणी मरणार नाही. म्हणजे ही स्वतःचीच हिंसा होत आहे.