________________
७६
अहिंसा
या लोकांना मोहाची जी नशा चढली आहे, ती अनादि जन्मांपासून उतरतच नाही आणि 'मी काही तरी आहे, मी काही तरी आहे' असे करत राहतात.
याचे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजावतो. एका छोट्याशा गावात एक जैन शेठ राहत होते. परिस्थिती साधारण होती. त्याला एक मुलगा तीन वर्षाचा आणि दुसरा मुलगा दीड वर्षाचा होता. अचानक प्लेगची साथ आली आणि आई-वडील दोघे मरून गेले. दोन्ही मुले जिवंत राहिली. नंतर गावकऱ्यांना कळल्यावर ते सर्व एकत्र जमले की 'आता या मुलांचे काय करावे? आपण यावर काही मार्ग काढू. मुलांसाठी कोणी पालक भेटला तर बरे होईल. एक सोनार होता, त्याने मोठया मुलाला सांभाळण्याची जवाबदारी घेतली. पण त्या दुसऱ्या मुलाला ठेवायला कोणी तयार होत नव्हता. म्हणून एक खालच्या (क्षुद्र) जातीचा मनुष्य म्हणाला, 'साहेब, मी पालक बनू का?' तेव्हा लोक म्हणाले, 'अरे, हा जैन शेठचा मुलगा आणि तू तर खालच्या जातीचा.' पण दुसरे लोक म्हणाले, 'त्याने नाही घेतले तर याला कुठे ठेवाल? मरून जाईल त्यापेक्षा जिवंत तर राहील. मग त्यात काय चुकीचे आहे ?' अशा प्रकारे दोन्ही मोठे झाले. मोठा सोनाराकडे वाढला. तो वीस-बावीस वर्षाचा झाला तेव्हा म्हणू लागला, 'दारू पिणे हा गुन्हा आहे, मांसाहार करणे हा पण गुन्हा आहे. आणि लहान मुलगा जेव्हा अठरा-वीस वर्षाचा झाला तेव्हा तो म्हणू लागला, 'की दारू प्यायला पाहिजे, दारू बनवली पाहिजे, मांसाहार केला पाहिजे.' आता हे दोन्ही भाऊ एका भेंडीचे दोन दाणे, मग असे वेगवेगळे का म्हणाले?
प्रश्नकर्ता : संस्कार.
दादाश्री : हो, संस्कार, वेगवेगळ्या पाण्याचे सिंचन झाले ! म्हणून मग कोणी म्हटले, 'याला तर जैन म्हणताच येणार नाही ना!' एक संत होते, त्यांना विचारले की, 'साहेब, हे तर दोघे भाऊ होते आणि दोघेही