________________
अहिंसा
म्हणजे जे मांसाहार खातात ते असा अहंकार करत नाहीत की 'आम्ही मारू आणि आम्ही असे करू.' हे तर अहिंसावालेच खूप अहंकार करतात की, 'मी वाचवतो.' अरे, वाचवणारे आहात तर घरी नव्वद वर्षाचे म्हातारे वडील आहेत, जे मरणोन्मुख अवस्थेत आहेत. त्यांना वाचव ना! पण असे कोणी वाचवतो का?
प्रश्नकर्ता : कोणीच वाचवत नाही.
दादाश्री : तेव्हा असे का बोलतोस की मी वाचवले आणि मी असे केले?! खाटिकाच्या हातातही सत्ता नाही. मारण्याची सत्ता असलेला कोणी जन्माला आलेलाच नाही. हा तर बिनकामाचा अहंकार करतो.' हा खाटिक म्हणतो की मी, ‘मोठमोठे जीव कापले.' तो त्याचा अहंकार करतो, तेव्हा रियल काय म्हणते?! या मारणाऱ्याचा मोक्ष होईल की त्या वाचवणाऱ्याचा मोक्ष होईल? दोघांचाही मोक्ष होणार नाही. दोघेही अहंकारी आहेत. हा वाचवण्याचा अहंकार करतो. आणि तो मारण्याचा अहंकार करतो. रियलमध्ये असे चालत नाही. रिलेटिव्हमध्ये चालते.
ते दोघेही अहंकारी आहेत भगवंत काही कच्ची माया नाही. भगवंतांकडे तर मोक्षात जाण्यासाठी कोणता कायदा आहे? एक दारू पिण्याचा अहंकार करतो आणि दुसरा दारू न पिण्याचा अहंकार करतो. त्या दोघांना भगवंत मोक्षात प्रवेश करु देत नाहीत. तिथे नशा करणाऱ्याला प्रवेश करु देत नाहीत. तिथे नशा न करणाऱ्याला प्रवेश करु देतात.
म्हणजे जे लोक दारू पित नाहीत त्यांनी मनात खोटी घेमराजी (घमेंड) ठेवणे हा भयंकर गुन्हा आहे. ते तर दारू पिणाऱ्यापेक्षाही वाईट आहे. दारू पित असेल तो तर बिचारा असेच सांगेल की, 'साहेब, मी तर अगदीच मूर्ख मनुष्य आहे, गाढव आहे, नालायक आहे.' आणि त्याच्यावर दोन मडके पाणी टाकले ना, तरीही त्याची नशा उतरते. पण