________________
अहिंसा
७३
अंघोळ करा, प्या, धुवा, कपडे धुवा. परंतु अनर्थ म्हणजे काही हेतू नसेल तर विनाकारण सांडासांडी करू नका.
अभयदान हे महादान! प्रश्नकर्ता : मग जैन धर्मात अभयदानाला एवढे महत्त्व का दिले
गेले?
दादाश्री : अभयदानाला तर सर्वांनीच महत्त्व दिले आहे. अभयदान तर मुख्य वस्तू आहे. अभयदान म्हणजे काय की इथे चिमण्या बसल्या असतील तर आपल्या भीतीने त्या उडून जाऊ नयेत म्हणून आपण हळूचकन दुसऱ्या बाजूने निघून जावे. रात्री बाराच्या सुमारास आपण बाहेरुन आलो असू आणि रस्त्यात दोन कुत्रे झोपलेले असतील तर ते आपल्या बुटाच्या आवाजाने घाबरून जागे होतील, असे समजून पायातून बूट काढून हळूहळू, आवाज न करता घरात येणे. आपल्यामळे कोणी घाबरेल त्यास मानवता कसे म्हणता येईल? बाहेर कुत्रे पण आपल्याकडून भयभीत व्हायला नकोत. आपण बुटाने पाय वाजवत-वाजवत आलो आणि कुत्रे असे कान टवकारून उभे राहिले, तर आपण समजावे की ओहोहो, आपण अभयदान चुकलो! अभयदान म्हणजे कोणत्याही जीवाला आपल्याकडून भय वाटता कामा नये. कुठे पाहिले आहेत का अभयदानी पुरुष? अभयदान तर सर्वात मोठे दान आहे.
___ मी बावीस वर्षांचा होतो तेव्हाही कुत्र्यांना माझ्याकडून भय वाटू देत नव्हतो. आम्ही निरंतर अभयदानच देत असतो, दुसरे काही देत नाही. जर कोणी आमच्यासारखे अभयदान द्यायला शिकला तर त्याचे कल्याण होऊन जाईल! भयाचे दान देण्याची तर लोकांना पूर्वीपासून पॅक्टिस आहे, नाही का? 'मी तुला बघून घेईल' असे म्हणेल. मग यास अभयदान म्हटले जाईल की भयाचे दान म्हटले जाईल?
प्रश्नकर्ता : मग हे जे आपण जीव वाचवतो ते अभयदान नाही का?