________________
अहिंसा
पास.' गलकटीया म्हणजे गळा कापणारा खाटिक, त्यांच्या जवळ माझे घर आहे. नंतर म्हणाले, ' करेगा सो पावेगा, तु क्युं होवे उदास ?' म्हणजे जो करेल तो त्याचे फळ भोगेल, मग तू कशाला उदास होतोस?' हे ऐकून तुलसीदास समजून गेले की माझी सर्व भक्ती धूळीस मिळवली. माझी अब्रूच काढली.
७१
अशी अब्रू जाणार नाही असे राहिले पाहिजे. आपली भावना चांगली ठेवावी. फक्त या काळातच नव्हे, हे तर अनादि काळापासूनच असेच चालत आलेले आहे. रामचंद्रजींचे नोकर सुद्धा मांसाहार करत होते. कारण क्षत्रिय मांसाहार केल्याशिवाय राहतात का ?
आपली भावना चांगली ठेवावी. त्या लोकांच्या भानगडीत पडूच नये. कारण ते लोक नासमजूतीमुळे भांडण उभे करतात. यामुळे काही फायदा तर होत नाही वर नुकसानच होते. याला काय अर्थ ? ते केव्हा शक्य असते ? की जर आपलाच राजा असेल आणि त्याने अधिकार गाजवला की, ‘हेय भाऊ, काही ठराविक दिवसात तुम्ही असे करु नका. ' परंतु आत्ता तर आपल्या हातात सत्ता नाही मग अशा शहाणपणा करायला कोणी सांगितले? तुम्ही तुमचे काम करा ना ! देवाच्या घरी कोणी मरतच नाही. तुम्ही तुमचे काम करुन घ्या आणि (अहिंसेची) अनुमोदना करा. कोणतीही वाईट भावना करु नका.
सर्वात मोठा अहिंसक कोण ?
परंतु हे जीव वाचवण्यापेक्षा एकच भाव करायचा की कोणत्याही जीवाला आपल्याकडून किंचितमात्र पण दुःख न होवो. मनानेही दुःख न होवो, वाणीनेही दु:ख न होवो आणि वर्तनानेही दुःख न होवो! बस, मग यासारखा मोठा अहिंसक कोणीच नाही. असा भाव असेल, इतकी जागृती असूनही जर देहाने जीवजंतु मारले गेले, ते मग 'व्यवस्थित !' आणि नवीन वाचवण्याच्या गोष्टी कोणाच्या करायच्या नाही.