________________
७०
अहिंसा
दादाश्री : हो, हो. प्रार्थना करावी, अशी भावना करावी, त्याचे अनुमोदन करावे. एखादा मनुष्य जर समजत नसेल तर आपण त्याला समजवावे. बाकी आजपासून ही हिंसा तर नाहीच, हे तर पूर्वीपासूनच चालू आहे. हे जग एका रंगाचे (मताचे) नाही.
आता महान संत तुलसीदास होते ना, त्यांनी कबीरसाहेबांची खूप ख्याती ऐकली होती. त्यांची महान संत म्हणून कीर्ति पसरलेली होती. म्हणून तुलसीदासांनी ठरवले की, मला त्यांचे दर्शन घेण्यास गेले पाहिजे. म्हणून तुलसीदास तिथून दिल्लीला आले. मग तिथे कोणाला तरी विचारले की भाऊ, कबीरसाहेबांचे घर कुठे आहे ? तेव्हा म्हणे, कबीरसाहेब म्हणजे जे वीणकर आहेत त्यांची गोष्ट करत आहात का? तर म्हणे 'हो.' त्यावर तो म्हणाला 'ती तर तिथे झोपडी बांधलेली आहे, तिथून खाटिकवाड्याकडून जा. मग तुलसीदास तर ब्राम्हण, शुद्ध माणूस, ते खाटिकवाड्यात शिरले रस्त्याच्या एका बाजूला बकरे टांगलेले होते तर एका बाजूला कोंबड्या टांगलेल्या होत्या. ते तर संकटात सापडले. ते या बाजूला असे बघत जायचे आणि थुकत जायचे. असे करत-करत ते कबीरसाहेबांच्या घरापर्यंत पोहचले. तर त्रास नाही का होणार? अशा गोष्टी तुलसीदासांनी पॅक्टीसमध्ये आणल्या नव्हत्या. कारण नेहमीच प्रत्येक गोष्ट पॅक्टीसमध्ये आणली पाहिजे. म्हणजे ही अशी फसगत झाली. मग तुलसीदास तिथे जाऊन घरात बसले. तेव्हा तिथे एक-दोन भक्त बसले होते त्यांनी तुलसीदासांना सांगितले की बसा साहेब, कबीरसाहेब आत स्वयंपाकघरात गेले आहेत. मग त्यांना खाटेवर बसण्यास सांगितले. नंतर कबीरसाहेब आले. ते म्हणाले, चला, आपण सत्संग करू या. पण तुलसीदासांच्या मनात जे होते ते कबीरसाहेबांना पटकन बोलून दाखवले की, तुम्ही एवढे मोठे संत, संपूर्ण हिंदुस्तानात तुमची कीर्ति
आहे. मग तुम्ही या खाटिकवाड्यात का राहता? कबीरसाहेब तर हजरजबाबी, त्यांना दोहा तयार करावा लागत नसे. ते बोलतील तोच दोहा. ते तर लगेच म्हणाले, 'कबीरका घर बाजार मे, गलकटीयों के