________________
अहिंसा
६२
जीवांची बळी प्रश्नकर्ता : कित्येक मंदिरात जीवांचा बळी देतात, ते पाप आहे की पुण्य आहे ?
दादाश्री : त्या बळी देणाऱ्याला आपण विचारले की तू यात काय मानतो? तेव्हा तो म्हणेल, मी पुण्य करत आहे. बोकडाला विचारले की तुझे काय मत आहे? तेव्हा तो म्हणेल हा खूनी माणूस आहे. त्या देवताला विचारले तर म्हणेल, 'तो देत असेल तर आम्ही नाही म्हणू शकत नाही. मी तर काही घेत नाही. हे लोक पायाला स्पर्श करवून घेऊन जातात.' म्हणजे यात पाप-पुण्यांची गोष्ट तर करुच नका. बाकी, हे जे काही करता ती तर सगळी स्वतःची जोखीमदारी आहे. तेव्हा समजून करा. मग तुम्ही काहीही अर्पण करा, तुम्हाला नाही कोण म्हणतोय? पण अर्पण करते वेळी लक्षात ठेवा की हॉल अॅन्ड सोल रिस्पॉन्सिबिलिटी आपलीच आहे, दुसऱ्या कोणाची नाहीच.
अहिंसेचे अनुमोदन, भावना-प्रार्थनेने आता या मुक्या प्राण्यांची हिंसा करु नये. गौहत्या करु नये. अशी भावना आपण विकसीत करावी आणि आपले अभिप्राय इतरांनाही समजावून सांगावे. आपल्याकडून जितके शक्य असेल तितके करावे. त्यासाठी इतरांशी भांडायची गरज नाही. कोणी म्हणेल की, 'आमच्या धर्मात म्हटले आहे की आम्ही मांसाहार करावा.' आणि आपल्या धर्माने मनाई केली असेल म्हणून आपण त्यांच्याशी भांडायची गरज नाही. आपण आपली भावना विकसित करुन तयार ठेवावी, मग जे भावनेत असेल ती संस्कृती चालेल.
आणि विश्व समष्टिचे कल्याण करण्याची भावना तर तुम्हाला रात्रंदिवस होत असते ना?! हो, मग त्यानुसार राहिले पाहिजे.
प्रश्नकर्ता : त्या बाबतीत आपण प्रार्थना तर करू शकतो ना?