________________
अहिंसा
शंभर बाजूंनी गोळ्या मारण्यास सुरुवात केली, तरीही त्याला गोळी शिवणार नाही. हे तर हिंसकांनाच गोळी लागते. प्रत्येक वस्तूचा स्वभाव आहे.
आत्ताच्या काळात फक्त अहिंसा पाळण्यात आली तर या संसारात लुटून घेतील. थोडया वेळेसाठी जर सूट देण्यात आली ना, तर इथे बसूही देणार नाहीत. कारण कलियुग असल्यामुळे लोकांची मने बिघडून गेलेली आहेत. अनेक प्रकारचे व्यसनी होऊन गेले आहेत. म्हणून वाटेल ते करतील. म्हणजे एका बाजूला गोळ्या असतील तर दुसऱ्या बाजूला अहिंसा टिकू शकेल, नाही तर बळजबरीने अहिंसा पाळून घ्यावी लागेल. पण तरी आता हा काळ याला बदलवत आहे! आता काळ या सर्व गोष्टी बदलवत आहे! तेव्हा आता तुम्ही खूप चांगला काळ बघाल. तुम्ही स्वतःच हे सर्व बघाल.
प्रश्नकर्ता : एक संत अहिंसा पाळत होते तरीही त्यांचा खून का झाला? कारण आताच तुम्ही सांगितले की जो अहिंसा पाळतो त्याच्यावर गोळीबार होत नाही.
दादाश्री : अहिंसा कशास म्हणतात? की कोणाच्याही कोणत्याही बाबतीत हस्तक्षेप करत नाही, त्यास म्हणतात अहिंसक. एकाला सांगतिल की यांना जास्त द्या. कारण ते नाठाळ आहेत. भले ते नाठाळ असतील, तरीही त्यांना जास्त द्या. असे म्हटले, की दुसऱ्या पक्षाला वाईट वाटते. म्हणून ते रुसतात. म्हणून यास हिंसा म्हटली जाते. यात पडूच नये. असा न्याय करुच नये. जो अहिंसक असेल तो न्याय करतच नाही. न्याय करतात तिथे हिंसा आहे.
बाकी, जर तुम्ही संपूर्ण अहिंसा पाळत असाल तर तुमच्यावर कोणीही गोळी झाडू शकत. नाही. आता संपूर्ण अहिंसा म्हणजे काय? तर एक सुद्धा पक्षपाती शब्द तोंडाने बोलू नये. आणि बोलाल तर अमुकच शब्द बोलू शकता. दुसरे शब्द बोलू नये. कोणत्याही दोन पार्टीत पडू नये. दोन पार्टीत पडले तर एकाची थोडी-फार हिंसा होतेच!