________________
अहिंसा
६७
म्हणजे तुमच्यात साप मारण्याची शक्ती नसेल तर इथे त्यांना मारणारे खूप आहेत, भरपूर आहेत आणि त्यांना मारणारी अन्य जाती पण पुष्कळ आहेत. म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव बिघडवू नका. हिंसा करण्यात काही फायदा नाही. हिंसा तर स्वत:चेच नुकसान करते.
जीवो जीवस्य जीवनम् प्रश्नकर्ता : मनुष्य बुद्धीजीवी प्राणी आहे म्हणून त्याने पशुहिंसा करायची नसते. परंतु एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाऊन जगू शकत असेल तर ते मानव आणि प्राणी यांच्यातील बुद्धीच्या फरकामुळे असा भेदभाव आहे का? प्राण्या प्राण्यांमधील हिंसेचे काय?
दादाश्री : प्राण्या प्राण्यांमधील हिंसेत यु आर नॉट रिस्पोन्सिबल ॲट ऑल. कारण या समुद्राच्या आत काही शेतं नसतात किंवा रेशनची दुकानेही नसतात. म्हणून तिथे हिंसा चालूच राहते. मोठे तोंड उघडून मोठे मासे बसलेले असतात, आणि लहान मासे तर त्यांच्या पोटातच शिरतात. आहे काही भानगड? नंतर तोंड बंद केले म्हणजे सर्व खलास! पण तुम्ही त्यासाठी जबाबदार नाही. हा तर जगाचा नियमच आहे. आपण मनाई करतो आणि ते सर्व बकऱ्यांना खाऊन टाकतात. मोठे जीव लहान जीवाला खातात, लहान जीव त्याच्याहीपेक्षा लहान जीवाला खातो. त्याहून लहान त्याहून लहानाला खातो. असे करत-करत संपूर्ण समुद्राचे जग चालत आहे. जोपर्यंत मनुष्य जन्माचा विवेक येत नाही तोपर्यंत सगळी सूट आहे. आता तिथे तर कोणी वाचवायला जात नाही आणि आपल्या इथे लोक वाचवण्यासाठी जातात.
संपूर्ण अहिंसकाला नाही कसली आंच प्रश्नकर्ता : परंतु हे अहिंसक माणसावर गोळीबार करतात.
दादाश्री : अहिंसक माणसांवर गोळीबार होतही नाही. कोणाला गोळीबार करायचा असेल तरी होणार नाही. जो अहिंसक आहे ना, त्याला