________________
६६
अहिंसा
की जास्त खाशील तर त्रास होईल. तेवढेच तुम्ही सांभाळायचे, बाकी लिमिटमध्ये खायचे.
प्रश्नकर्ता : पण दूध तर निसर्गाने वासरासाठी दिले आहे. आपल्यासाठी दिले नाही.
दादाश्री : ही चुकीची गोष्ट आहे. हे तर जंगली गाई आणि जंगली म्हशी होत्या ना, त्यांची वासरं सर्व दूध पिऊन टाकायची. आणि आपल्या इथे तर आपले लोक गाईला चांगले खाऊ घालून पोषण करतात. म्हणजे वासराला पण पाजायचे आणि आपण सर्वांनी सुद्धा प्यायचे. आणि आदीअनादिपासून हा व्यवहार चालत आला आहे. आणि गाईला चांगल्या प्रकारे पोषण दिले ना तर गाई १५-१५ लिटर दूध देते. कारण तिला चांगले खाऊ-पिऊ घातले तर नॉर्मल दुधाच्या मानाने ती खूप जास्त दूध देते. आणि दूध इतकेच घ्यायचे की वासरू उपाशी राहणार नाही.
__ चक्रवर्ती राजा तर हजार-हजार, दोन-दोन हजार गाई ठेवत असत. त्यास गोशाळा म्हणत होते. चक्रवर्ती राजा दूध कसे पित असतील? गोशाळेत हजार गाई असतील, तर त्या हजार गाईंचे दूध काढायचे आणि ते दूध शंभर गाईंना पाजायचे, त्या शंभर गाईंचे दूध काढायचे आणि ते दहा गाईंना पाजायचे. आणि त्या दहा गाईंचे दूध काढायचे आणि ते एका गाईला पाजायचे आणि त्या एका गाईचे दूध चक्रवर्ती राजा पीत असत.
हिंसक प्राण्याची हिंसेत हिंसा? प्रश्नकर्ता : कोणत्याही प्राण्याला मारणे ही हिंसा आहे. परंतु हिंसक प्राणी की जे इतर प्राण्यांना किंवा मनुष्यांना इजा पोहोचवतात किंवा जीवहानी करू शकतात, तर त्यांची हिंसा करायची की नाही?
दादाश्री : कोणाचीही हिंसा करायची नाही असा भाव ठेवावा. आणि तुम्ही सापाला मारले नाही तर दुसरा कोणीतरी मारणारा भेटेल.