________________
अहिंसा
६५
जीवांना तुमच्यामुळे त्रास होत असेल अशा जीवांना मारू नका, त्यांना खाऊ नका, त्यांना काहीच करू नका.
प्रश्नकर्ता : या अंड्यांना तर त्रास होत नाही, मग त्यांना खाणे चांगले आहे की नाही?
दादाश्री : अंड्यांना त्रास होत नाही. पण अंड्यात जो जीव आहे तो बेशुद्धावस्थेत आहे. पण ते फुटते तेव्हा तरी आपल्याला समजते की नाही?
प्रश्नकर्ता : लगेच समजते. पण अंडे तर मागेपुढे होत नाही ना!
मग?
दादाश्री : ते नाही होत. कारण ते बेशुद्धावस्थेत आहे. म्हणून होत नाही. हा मनुष्याचाही गर्भ चार-पाच महिन्यांचा असतो, तोपर्यंत तोही अंड्यासारखाच असतो. म्हणून त्यास मारू नये. त्यामधून फुटते तेव्हा काय होते ते आपण समजू शकतो.
दूध घेऊ शकतो का? प्रश्नकर्ता : ज्याप्रमाणे व्हेजिटेरियन अंडे खाऊ शकत नाही त्याप्रमाणे गाईचे दूध सुद्धा पिऊ शकत. नाही?
दादाश्री : अंडे खाऊ शकत नाही. पण गाईचे दूध आपण खुशाल पिऊ शकतो. गाईच्या दुधाचे दही पण खाऊ शकतो, काही माणसे लोणी पण खाऊ शकतात. नाही खाऊ शकत असे नाही.
देवाने लोणी खाण्यास नाही कशाला सांगितले? ती वेगळी गोष्ट आहे. तेही ठराविक माणसांसाठीच नाही सांगितले आहे. गाईच्या दुधाची खीर करून खुशाल खाऊ शकता. त्याची बासुंदी केली तरीही हरकत नाही. एखाद्या शास्त्रांनी मनाई केली असेल तरी मी तुम्हाला सांगेल की जा काही हरकत नाही. ते शास्त्र चुकीचे आहे. तरीही असे सांगितले आहे