________________
६४
अहिंसा
त्या सर्व गोष्टी हम्बग (फालतू) आहेत. मग लोकांना असे का फसवता?
त्या दुसऱ्या प्रकारच्या अंडयावाल्यांनी त्या अंडयाला या जगात कोणत्या रुपात ठेवले हेच आश्चर्य आहे. त्या दुसऱ्या जातीच्या अंडेवाल्यांना विचारले की, हा दुसऱ्या प्रकारचा जीव सजीव आहे की निर्जिव आहे, ते मला सांगा. निर्जिव असेल तर खाल्ले जाऊ शकत नाही. संपूर्ण जगाला मूर्ख बनवले, कसली माणसे आहात तुम्ही? ज्यात जीव नसतो ते आपण खाऊ शकत नाही. ते अखाद्य मानले जाते.
प्रश्नकर्ता : पण हे व्हेजिटेरियन अंडे फळत नाही.
दादाश्री : ते फळत नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण ते जिवंत आहे.
___ म्हणजे हे असे सर्व मनात ठसवले, मग या जैनांच्या मुलांना किती त्रास! या गोष्टीवरून तर ती सर्व मुले माझ्याशी भांडली होती. नंतर मी त्यांना समजावले की, 'भाऊ, तुम्ही थोडा विचार तर करा. निर्जिव असेल तर हरकतच नाही पण आपण निर्जीव खाऊच शकत नाही.' नंतर सांगितले, की जर जास्त शहाणपणा करत असाल तर तुम्ही धान्य वगैरे पण खाऊ शकत नाही. मग तुम्ही निर्जिव वस्तूच खा.' आणि निर्जीव वस्तू तर शरीराला उपयोगी पडत नाही. त्यात विटामिन नसतात. निर्जीव वस्तू शरीराची भूक तर मिटवतात, पण त्यात विटामिन नसते. म्हणून शरीर जगत नाही. हवे ते विटामिन मिळत नाहीत ना! निर्जीव वस्तू तर चालतच नाही. तेव्हा त्या मुलांनी स्वीकारले की आजपासून आम्ही अंडे खाणार नाही. समजावले तर लोक समजण्यास तयार आहेत. नाही तर हे लोक मनात असे ठसवून देतात त्यामुळे मग बुद्धी पालटते.
हे जे आपण गहू, तांदूळ वगैरे खात असतो, लांब लचक दुधी खातो, ते सर्व जीवच आहेत ना! जीव नाहीत का? पण भगवंताने खाण्याची बाउन्ड्री दिली आहे की हे जीव तुम्ही खाऊ शकता. पण ज्या