________________
अहिंसा
६३
कबुतराचे ब्लड कसे असेल? तर खूपच गरम. सर्वात जास्त गरम रक्त कबुतराचे आहे आणि ते खूप समजूतदारही आहे. कारण ते व्हेजिटेरियन, प्यॉर व्हेजिटेरियन आहे.
म्हणजे फक्त मनुष्यच फळाहारी आहेत असे नाही. पण आपल्या गाई, म्हशी, गाढव हे सुद्धा फळाहारीच आहेत. ही काय सामान्य गोष्ट आहे ? हे गाढव खूप उपाशी असतील आणि त्यांना जर मांसाहार खाण्यास दिला तर ते खाणार नाहीत. म्हणून आपल्याला अहंकार करण्यासारखे नाही की, 'भाऊ, आम्ही प्यॉर व्हेजिटेरियन आहोत.' असे नव्हे, शुद्ध शाकाहारी तर या गाई म्हशी सुद्धा आहेत, मग यात तू काय नवीन केलेस? हे प्यॉरवाले तर कधी तरी अंडेही खाऊन येतात. जेव्हा की ते तर कधीच खात नाहीत. 'आम्ही प्यार, प्यार, प्यार, असे बोलण्यासारखे नाही आणि जे मांसाहार करतात त्यांची टीकाही करण्यासारखी नाही.
अंडे खाऊ शकतो? प्रश्नकर्ता : कित्येक लोक वाद घालतात की, अंडी दोन प्रकारची असतात, एक जीववाले आणि दुसरे निर्जीव. मग ते खाऊ शकतो की नाही?
दादाश्री : फॉरेनमध्ये ते लोक वादविवाद करत होते की, अहिंसक अंडे! म्हणून मी सांगितले, या जगात जीव नसलेले काहीच खाऊ शकत नाही. निर्जिव वस्तू खाऊच शकत नाही. अंड्यात जर जीव नसेल तर ते अंडे खाऊ शकत नाही, मग ती जड (निर्जिव) वस्तू झाली. कारण ज्यात जीव नसेल ती जड वस्तू झाली. तुम्हाला जीवाला खायचे असेल ना तर त्याला असे कापल्यानंतर दोन-तीन दिवसापर्यंत नासणार नाही तोपर्यंतच खाऊ शकतो. हा भाजीपाला पण तोडल्यानंतर ठराविक काळापर्यंतच खाऊ शकतो, नंतर तो नासतो. अर्थात जिवंत वस्तूच खाऊ शकतो. अंडे जर निर्जीव असेल तर त्यास खाऊ शकत नाही, सजीव असेल तरच खाऊ शकतो. तेव्हा हे लोक जर अंड्याला सजीव म्हणत नसतील तर