________________
अहिंसा
गुन्हेगार, खाटिक की खाणारा? प्रश्नकर्ता : जर एखादा खाटिक 'दादां' कडे ज्ञान घेण्यास आला, व 'दादांनी' त्याला ज्ञान दिले. पण त्याचा धंदा चालूच आहे आणि चालूच ठेवणार आहे, तर त्याची काय दशा होईल?
दादाश्री : पण खाटिकाची दशा काय वाईट आहे ? खाटिकने काय गुन्हा केला आहे ? खाटिकाला तुम्ही विचारुन तर बघा की, 'भाऊ, तू कशाला असा धंदा करतोस?' तेव्हा तो म्हणेल की, 'भाऊ, माझे बाप-दादा करत होते, म्हणून मी करतो. माझ्या पोटासाठी, माझ्या मुलांच्या पालन-पोषणासाठी करतो.' आपण विचारु, ‘पण तुला हा शौक आहे का?' तेव्हा तो म्हणेल, 'नाही, मला शौक नाही.'
म्हणजे या खटीकापेक्षा तर खाणाऱ्याला जास्त पाप लागते. बिचाऱ्याचा खाटीकाचा तर तो धंदाच आहे. त्याला मी ज्ञान देतो. इथे माझ्याजवळ आला असेल तर मी त्याला ज्ञान देतो. त्याने ज्ञान घेतले तरी काही हरकत नाही. भगवंताकडे यास हरकत नाही.
कबुतर, शुध्द शाकाहारी आपल्या इथे हिंदुस्तानात कबुतरखाने असतात पण कावळाखाने ठेवले नाहीत? पोपटखाना, चिमणीखाना असे का नाही ठेवत आणि फक्त कबुतरखानाच ठेवतात? काही कारण असेलच ना? कारण फक्त हे कबुतरच व्हेजिटेरियन आहे, नॉनव्हेजला ते शिवतही नाही. तेव्हा आपल्या लोकांना वाटले की, पावसाळ्यात ते बिचारे काय खातील? म्हणून आपल्या इथे कबुतरखाने बनवून तिथे ज्वारीचे दाणे टाकतात. आता जर त्यात सडलेला दाणा असेल तर ते खात नाहीत, कारण त्याच्या आत जीवजंतु आहे म्हणून ते खात नाहीत. कबुतर म्हणजे पूर्णपणे अहिंसक! या मनुष्यांनी बाउन्ड्री सोडली, पण हे कबुतर बाउन्ड्री सोडत नाही. कबुतर सुद्धा प्यॉर व्हेजिटेरियन आहे. म्हणून संशोधन केले की