________________
अहिंसा
दादाश्री : असे आहे, अहिंसक असतो ना, तो जर पशुगतीत गेला, तर गाय होईल किंवा म्हैस होईल. आणि हिंसक असेल तो वाघात जाईल, कुत्र्यात जाईल किंवा मांजरीत जाईल, जिथे हिंसक प्राणी असतील तिथे जाईल. पण मनुष्यात अहिंसक असेल ना, तरी तो हिंसकाकडे जन्म घेतो. तेव्हा मग त्याच्यावर हिंसकाचे संस्कार पडतात. तोही ऋणानुबंधच आहे ना! हिशोबच आहे ना ! राग-द्वेष होतो तोच ऋणानुबंध. ज्याच्यावर राग केला तिथे चिकटतो. आणि ज्याच्यावर द्वेष केला तिथेही चिकटतो. द्वेष केला की 'हा नालायक आहे, बदमाश आहे, असा आहे, तसा आहे, ' तर मग तिथेच त्याचा जन्म होतो.
नाही स्पर्शत काही अहिंसकाला
६०
प्रश्नकर्ता : हा कुत्रा चावतो त्यात कोणता ऋणानुबंध असतो ?
दादाश्री : ऋणानुबंधाशिवाय तर एक राईचा दाणा सुद्धा तुमच्या तोंडात जात नाही, खालीच पडतो.
प्रश्नकर्ता : जर आपल्याला कुत्रा चावला तर आपण त्याच्यासोबत काही कर्म बांधले असेल का ?
दादाश्री : नाही, तसे त्याच्यासोबत कर्म बांधलेले नसते. पण हे तर आपल्या इथे मनुष्य असून सुद्धा चावत नाहीत का ? लोक असेही म्हणता ना की, हा मेला मला चावत राहतो! एक जण तर मला म्हणत होता की, 'माझी बायको तर अशी की तिला नागीण म्हटले तरी चालेल. रात्री चावतच राहते. आता खरोखर ती चावत नाही. पण ती असे काही बोलते की, ते आपल्याला चावल्यासारखे दुःख वाटते. आता असे बोललो ना, त्याच्या फळस्वरुपात आपल्याला कुत्रे चावतात, दुसरे सर्वही चावतात. निसर्गाच्या घरी सामान तयार असते, सगळीकडे बॉम्बार्डिंग करण्यासाठी. तुम्ही जी कर्म बांधली आहेत ती कर्म चुकते करण्यासाठी निसर्गाकडे साधन तयारच आहे.