________________
अहिंसा
५९
दादाश्री : ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे आणि खाण्यासाठी दुसरे अनेक पदार्थ आहेत. मग बोकडाला का कापता ? कोंबडीला कापून खातात, तर काय तिला त्रास होत नसेल ? त्यांच्या आई - वडिलांना त्रास होत नसेल? तुमच्या मुलाला कोणी खाऊन टाकले तर काय होईल ? मांसाहार करणे म्हणजे कुठलाही विचार न करता करणे. निव्वळ पशुताच आहे, अविचारी अवस्था आहे. आणि आपण तर विचारशील आहोत. फक्त एकदाच जरी मांसाहार केला तरी माणसाची बुद्धी नष्ट होऊन जाते, पशुसमानच होऊन जातात. म्हणून डोके (बुद्धी) जर चांगले ठेवायचे असेल तर अंडे खाण्यापर्यंतचा सर्वच मांसाहार बंद केला पाहिजे. अंड्यांपासून खालील सर्व पशुताच आहे.
मांसाहारात त्या जीवाला मारण्याचा दोष लागतो त्याहीपेक्षा आत जे आवरण येते त्याचा जास्त दोष लागतो. मारण्याचा गुन्हा तर ठीक आहे. हा गुन्हा कशाप्रकारे घडतो ? मूळ व्यापार करतो त्यात वाटले जाते. खाणाऱ्याच्या वाट्याला तर अमुकच दोष जातो. पण हे तर आत स्वत: वर असे आवरण आणते, म्हणून माझी गोष्ट समजण्यासाठी त्याला खूप आवरणे येतात. या व्यवहाराची गोष्ट कित्येक लोक स्पीडीली ( पटकन) समजून जातात, त्यास ग्रास्पिंग पावर म्हटले जाते.
हिशोबानुसार गती
प्रश्नकर्ता : पण असे घडू शकते का की, हिंसक माणूस अहिंसक योनीत जातो किंवा अहिंसक माणूस हिंसक योनीत जातो ?
दादाश्री : हो, खुशाल जातो. या जन्मात अहिंसक असेल आणि दुसऱ्या जन्मात हिंसक होतो. कारण तिथे त्याला हिंसक आई-वडील मिळाले. म्हणजे आजुबाजूस तसे संजोग जुळून आले त्यामुळे तो तसा
झाला.
प्रश्नकर्ता : याचे कारण काय ?