________________
अहिंसा
गरज नाही. तुम्ही आत्मसाधनेत पूर्णपणे, हन्ड्रेड पर्सेन्ट लक्ष घाला. आणि हे दुसरे सर्व कम्प्लिटच आहे. म्हणूनच मी सांगतो ना, की भूतकाळ निघून गेला, भविष्यकाळ 'व्यवस्थित-शक्तीच्या' ताब्यात आहे. म्हणून वर्तमानात राहा.
तरी सुद्धा आम्ही काय सांगतो की, ज्या देहाने ज्ञानी पुरुषांना ओळखले, त्यास मित्र समान माना. ही औषधे हिंसक असतील तरीही त्याचा उपयोग करा पण शरीराची काळजी घ्या. कारण हा लाभालाभाचा व्यापार आहे. या शरीराने ज्ञानी पुरुषांना ओळखले आहे आणि असे हे शरीर जर आणखी दोन वर्ष जास्त टिकले तर दोन वर्षात तर ते जबरदस्त काम करू शकेल. एकीकडे हिंसा झाल्याबद्दल नुकसान होईल, पण या नुकसानीपेक्षा वीस पटीची कमाई आहे. तर वीसमधून एकोणीस तर आपल्याकडे राहिले. म्हणजे हा लाभालाभाचा व्यापार आहे. ___बाकी, केवळ जीवजंतुच आहेत. हे जग म्हणजे निव्वळ जीवच आहेत. हा श्वास घेण्यात तर कितीतरी जीव मरून जातात, मग आपण काय करावे? श्वास घेतल्याशिवाय बसून राहायचे? बसून राहिले असते तर चांगले, त्यांचा निवाडा (!) लागला असता. हा तर उगाचच वेडेपणा केला आहे.
आता या सर्वांचा तर कधी अंतच येणार नाही. तेव्हा तुम्ही जे काही करत असाल ते करत राहा. यात काही ढवळाढवळ करण्याची गरजच नाही. फक्त ज्या जीवांना आपल्याकडून त्रास होतो, अशा जीवांना शक्यतोवर दुःख देऊ नका.
आहार, डेवलपमेन्टच्या आधारे फॉरेनवाले काय म्हणतात? 'देवाने हे जग बनवले म्हणून या मनुष्यांना बनवले. आणि दुसरे सर्व बोकड-मासे हे आम्हाला खाण्यासाठी देवाने बनवले.' अरे, तुमच्या खाण्यासाठी बनवले तर मग हे मांजर, कुत्रे,