________________
अहिंसा
दादाश्री : हिरव्या भाजीपाल्याविषयी पण लोकांनी उलटेच समजून घेतले आहे. हिरव्या भाज्या म्हणजे जीवांची हिंसा नव्हे. हिरव्या भाज्यांवर सूक्ष्म जीवजंतु बसतात आणि ते जीवजंतु पोटात गेले तर रोग होतात, शरीराला त्रास होतो म्हणून मग धर्म कार्य करु शकत नाही. यासाठी भगवंताने पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाण्यास मनाई केली आहे. आम्ही काय सांगू इच्छितो की, तुम्ही असे उलटे का समजता. म्हणजे जे चोपडण्याचे (औषध) होते ते सर्व पिऊन टाकले आणि जे पिण्यास सांगितले होते, ते चोपडत राहतात म्हणून तर रोग बरा होत नाही.
'एन्टीबायोटिक्सने' होणारी हिंसा प्रश्नकर्ता : ताप आला, फोड झाले, त्यात पू झाला, मग ते जंतु मारून टाकण्याचे औषध देतात...
दादाश्री : अशा जंतुंची चिंता करायची नाही.
प्रश्नकर्ता : पोटात कृमी झाले असतील आणि त्याला जर औषध दिले नाही तर तो मुलगा मरुन जाईल.
दादाश्री : त्याला असे औषध पाजा की ज्यामुळे आत कृमी वगैरे काही राहणारच नाही, ते करावेच लागेल.
प्रश्नकर्ता : आता आत्म साधनेसाठी देहाला चांगले ठेवावे पण ते करताना इतर जीवांची हानी होत असेल तर ते करावे की नाही?
दादाश्री : असे आहे की, आत्मसाधना कशाला म्हणतात? की तुम्हाला देहाची काळजी घ्यायची आहे, असा भाव ठेवला तर साधना कमी होईल. जर पूर्ण साधना करायची असेल तर तुम्ही शरीराची काळजी घेऊ नका. शरीर तर त्याचे सर्व सोबत घेऊन आले आहे, सर्वच प्रकारचा सांभाळ घेऊन आले आहे. तुम्हाला त्यात काही ढवळाढवळ करण्याची