________________
अहिंसा
५१
म्हणजे पाणी गरम करणे हे हिंसेसाठी सांगितले नाही, हे तर शारीरिक आरोग्यासाठी सांगितले आहे. पाणी गरम केल्याने त्यातले जलकाय जीव मरतात. परंतु हे त्याच्या पापासाठी सांगितलेले नाही, तुमच्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे, पोटात जीवाणू उत्पन्न होऊ नये आणि ज्ञानावर आवरण येऊ नये, यासाठी सांगितले आहे. पाणी गरम केल्याने जे मोठे जंतू असतात ते सर्व मरून जातात.
प्रश्नकर्ता : मग तर ती हिंसा झाली ना?
दादाश्री : या हिंसेची हरकत नाही. कारण शरीर निरोगी राहिले तर तुम्ही धर्मकार्य करू शकता. नाही तरी सर्व हिंसाच आहे ना. या जगात नुसती हिंसाच आहे. हिंसेच्या पलीकडे एक अक्षरही नाही. तुम्ही जे खाता, पिता हे सर्व जीवच आहेत.
___ तर आता भगवंताने एकेंद्रिय जीवांसाठी असे सर्व करण्यास सांगितलेलेच नाही. हे तर सर्व उलटेच समजून घेतले आहे. एकेंद्रिय जीवासाठी जर असे सांगितले असते ना, तर 'उकळल्या शिवायचे थंड पाणीच प्या, पाणी उकळल्याने सर्व जीव मरून जातात' असे सांगितले असते. पाणी गरम करण्यात किती जीव मारले?
प्रश्नकर्ता : अनेक.
दादाश्री : त्यात जीव दिसत नाहीत. पण हे पाणी आहे ना, ते अपकाय जीव आहेत, त्यांची काया, त्यांचे शरीरच पाणी आहे. बोला आता, त्यात जीव कुठे बसले असतील? लोकांना ते कसे सापडतील? हे तर शरीर दिसते. या सर्व जीवांचे शरीर एकत्र केले. तेच पाणी आहे. पाणीरुपी ज्यांचे शरीर आहे असे ते जीव आहेत. आता याचा कधी अंत येईल?
हिरव्या भाजीपाल्यात समजले उलटे प्रश्नकर्ता : पावसाळ्यात हिरव्या फळभाज्या पालेभाज्या, खाऊ नये असे सांगितले आहे ते कशासाठी?