________________
५०
अहिंसा
आम्हा ज्ञानी पुरुषांना तर त्यागात्याग नसतो. तरी पण कित्येक लोक इतके दुःखी होतात की, 'तुम्ही चोवियार करत नाही? आम्हाला खूप दुःख वाटते. मी सांगितले,' 'मग चेवियार करु.' काय करावे मग? कारण ज्ञानी झाल्यानंतर त्यागात्याग संभवत नाही, पण मग लोकांना समजेल त्यानुसार करतात. बाकी, आम्हाला कोणत्याही गोष्टीची इच्छाच नाही ना! आम्हाला तर भगवंताने हिंसेच्या समुद्रात अहिंसक म्हटले आहे. बाकी, आम्ही तर पूर्वीपासूनच कायम चोवियार करीत होतो. आता तर आम्हाला कधी सत्संगासाठी जायचे असते ना, तेव्हा कधी चोवियार असतो आणि वेळ प्रसंगी दोन-चार दिवस चोवियार नसतोही. पण आमचा हेतू मात्र चोवियाराचा असतो. ती मुख्य वस्तू आहे.
। उकळलेले पाणी, पिण्यात... प्रश्नकर्ता : पाण्याला उकळून पिण्याचे सांगितले आहे ते कशा साठी?
दादाश्री : ते काय सांगू इच्छितात? की पाण्याच्या एका थेंबात अनंत जीव आहेत. म्हणून पाण्याला खूप उकळले की ते जीव मरून जातात. आणि नंतर ते पाणी प्यायले तर तुमचे शरीर चांगले निरोगी राहिल आणि त्यामुळे आत्मध्यान राहिल. तेव्हा लोक या गोष्टीला भलतेच समजून बसले.
भगवंताने तर शरीर निरोगी राहण्यासाठी सर्व प्रयोग सांगितले आहेत. म्हणून पाणी उकळून पिण्यास सांगितले. पाणी उकळले नाही तर त्यास जीवहिंसा पाळली असे म्हटले जाईल. स्वतःचे शरीर जरी बिघडले तरी चालेल पण आम्ही तर पाणी उकळणार नाही. परंतु भगवंताने तर पाणी उकळून पिण्याचे सांगितले आहे, कारण त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. आणि आठ तासानंतर पुन्हा त्यात जीव पडतील म्हणून आठ तासानंतर ते पाणी पिऊ नका, नंतर दुसरे पाणी उकळून घ्या, असे सांगतात.