________________
अहिंसा
तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे करा. भगवंताने असे नाही सांगितले की तुमच्या क्षमतेपलीकडेचे करा.
ज्ञानी एखाद्या गोष्टीचे शेपूट (आग्रह) धरुन ठेवतील असे नसतात. आणि दुसरे लोक तर शेपूटच धरुन ठेवतात. ज्ञानी तर काय सांगत होते की लाभालाभाचा व्यापार पाहा! शरीराला कांद्याचा पंचवीस टक्के फायदा झाला आणि कांदा खाल्ल्याने पाच टक्के नुकसान झाले, म्हणजे आपल्याला वीस टक्क्यांचा फायदा झाला अशा प्रकारे करत असत. जेव्हा की या लोकांनी लाभालाभाचा व्यापारच उडवून टाकला आणि मारून-ठोकून 'कांदा खाणे बंद कर, बटाटा खाणे बंद कर' असे करायला सांगितले. अरे, पण हे कशासाठी? बटाट्याशी तुमचे वैर आहे ? की कांद्याशी वैर आहे? आणि त्याला तर जे सोडले असेल ना त्याचीच सतत आठवण येत राहते. देवासारखी, सतत त्याचीच आठवण येत राहील!
___ 'आम्ही' सुद्धा नियम पाळल होते
मी काही जैन नव्हतो. मी जेनेतर होतो. पण तरीही हे आत्मज्ञान होण्यापूर्वी कायमसाठी कंदमूळाचा त्याग होता. नेहमीच चोवियार असायचा, नेहमी गरम पाणी (उकळून) पित होतो. बाहेरगावी गेलो की कुठेही गेलो तरीही उकळलेले पाणी असायचे. आम्ही आणि आमचा भागीदार, आम्ही दोघेही उकळलेल्या पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवत होतो. म्हणजे आम्ही तर भगवंताच्या नियमातच राहत होतो.
__ आता कोणाला हे नियम पाळणे कठीण वाटत असेल तर असे काही नाही की तुम्ही सर्व नियम पाळलेच पाहिजेत. मी तुम्हाला असे सांगणार नाही की तुम्ही असेच करा. तुमच्याकडून होईल तर करा. ही चांगली गोष्ट आहे, हितकारी आहे. भगवंताने ते हितकारी आहे म्हणून सांगितले आहे, त्याला (आग्रहाने) धरुन ठेवण्यासाठी सांगितलेले नाही. त्याचे आग्रही होण्यास सांगितले नाही.