________________
अहिंसा
वाघ यांना का खात नाही ! खाण्यासाठी बनवले असेल तर सर्व सारखेच बनवले असते ना? देव असे करत नाही. देवाने बनवले असेल तर तुमच्यासाठी सर्व खाण्यालायक वस्तूच बनवेल. पण हे तर त्याचबरोबर अफीण सुद्धा बनवतो की नाही बनवत ? आणि कूच (एक प्रकारचे जंगली रोपटे ) सुद्धा असते ना ? त्यालाही बनवतो ना? जर देव बनवत असेल तर हे सगळे कशासाठी बनवेल ? कूच आणि या सगळ्यांची काय गरज आहे ? मनुष्याला सुख देणाऱ्याच सर्व वस्तू बनवेल ना! म्हणून चुकीचे ज्ञान प्राप्त करून घेतले की, हे देवाने बनवले. आणि हे फॉरेनवाले तर अजून पुनर्जन्मलाही समजत नाहीत. म्हणून त्यांना असे वाटते की, हे सर्व आपल्या खाण्यासाठीच आहे. आता जर पुनर्जन्माला समजतील तर त्यांच्या मनात विचार येईल की, जर आपला असा जन्म झाला तर काय होईल ? पण त्यांना असा विचार येत नाही.
५४
आपल्या हिंदुस्तानातील लोकांना असा विचार आला, म्हणून हे ब्राम्हण लोक म्हणतात की, आम्ही मांसाहार करू शकत नाही, वैश्य म्हणतात की, आम्ही पण करू शकत नाही. क्षुद्र म्हणतात आम्ही करु शकतो. पण ते लोक तर मेलेल्या प्राण्यालाही खातात. आणि हे क्षत्रिय सुद्धा मांसाहार करतात.
चीड, मांसाहारीवर
दादाश्री : तुम्ही व्हेजिटेरियन पसंत करता की नॉन व्हेजिटेरियन ? प्रश्नकर्ता : मी अजून नॉनव्हेजिटेरियन चाखलेले नाही. दादाश्री : पण ती चांगली वस्तू आहे असे कधी बोलले नाही ?
प्रश्नकर्ता : नाही. मी व्हेजिटेरियन आहे. पण याचा अर्थ असा नाही की, नॉनव्हेजिटेरियन वाईट आहे.
दादाश्री : बरोबर आहे. मी त्यास वाईट म्हणत नाही.