________________
अहिंसा
४७
कंदमूळ, सूक्ष्म जीवांचे भांडार प्रश्नकर्ता : कंदमूळ खातात त्यात काही निषेध आहे का?
दादाश्री : खूप मोठा निषेध. रात्रीभोजनावर एवढा निषेध नाही. रात्रीभोजन दुसऱ्या नंबर वर येते.
प्रश्नकर्ता : कांदे-बटाटे यात अनंत जीव आहेत? दादाश्री : हो, ते अनंतकाय जीव आहेत, मग? प्रश्नकर्ता : मग तुम्ही ते खाण्याचा बोध देता का?
दादाश्री : भगवंताने मनाई केली आहे. भगवंताने मनाई केली आहे हे तुमच्या बिलिफमध्ये असायलाच पाहिजे. आणि तरी देखील तुमच्याकडून खाल्ले गेले तर तो तुमच्या कर्माचा उदय आहे. तरी पण तुमची श्रध्दा मात्र बिघडायला नको. भगवंताने जे सांगितले आहे, त्याबद्दल श्रद्धा बिघडायला नको.
प्रश्नकर्ता : कंदमूळ खाऊ नये, असे का सांगितले? दादाश्री : कंदमूळ तर मेंदूला जागृत होऊ देत नाही. प्रश्नकर्ता : एकेंद्रिय जीवाची हानी होईल यासाठी नाही?
दादाश्री : हे तर लोक असे समजतात की, बटाट्यातील जीवाचे रक्षण व्हावे म्हणून खाऊ नये. आता जर का बटाटे आवडत असतील तर जास्त पुढेमागे करु नका, कारण ह्या काळात लोकांना दुसरे काही आवडत नाही. आणि तेही सोडले तर काय करतील?
प्रश्नकर्ता : पण असे म्हणतात की बटाटे खाल्ले तर पाप लागते?
दादाश्री : असे आहे, कुठल्याही जीवाला दुःख दिले तर पाप लागेल. खरे तर नवऱ्याला, बायकोला, मुलांना, शेजाऱ्यांना दुःख दयाल