________________
४६
अहिंसा
माहीत आहे ते दुसऱ्या संयोगात गुंतलेले असतात. बाकी रात्रीभोजन केले नाही तर फारच उत्तम आहे. कारण ते महाव्रत आहे. इतर पाच महाव्रताबरोबर हे सहावे महाव्रत आहे.
प्रश्नकर्ता : काही कारणाने रात्रीभोजन करावे लागले तर यात कर्माचे बंधन आहे का?
दादाश्री : नाही. कर्माचे बंधन वगैरे काही नाही. ते कशामुळे तोडावे लागते? आणि रात्री भोजनाचा त्याग केला, ते कोणीतरी शिकवले असेल ना?
प्रश्नकर्ता : जैन लोकांचे संस्कार असतात ना!
दादाश्री : हो. तर मग महावीर भगवंतांचे नाव घेऊन प्रतिक्रमण करावे. ही भगवंतांची आज्ञा आहे म्हणून आज्ञा पाळावी. आणि ज्या दिवशी पाळले गेले नाही तेव्हा त्यांची माफी मागून घ्यावी. म्हणजे जर अहिंसा पाळायची असेल तर शक्यतोवर दिवसा जेवण केलेले उत्तम. तुमचे शरीरही खूप सुंदर राहिल. तुम्ही नेहमीच लवकर जेवता का?
प्रश्नकर्ता : नुकतीच सुरुवात केली आहे. दादाश्री : कोणी करायला सांगितले? प्रश्नकर्ता : स्वत:च्या इच्छेनेच.
दादाश्री : पण आता हे अहिंसेच्या हेतूने करत आहे असे माना. 'दादांनी' मला (अहिंसेची) समज दिली आणि ती मला आवडली, म्हणून मी आता हे अहिंसेसाठीच करत आहे असे समजून करा. कारण ते जर हेतूशिवाय असेल तर व्यर्थ जाते. समजा तुम्ही म्हटले की, मी फॉरेनला जाण्यासाठीच पैसे भरत आहे तर फॉरेन जाण्याचे तिकीट तुम्हाला मिळेल. पण तुम्ही असे काही सांगितलेच नसेल तर मग तुम्हाला कशाचे तिकीट देतील?