________________
अहिंसा
होते.
४५
दादाश्री : शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि हिंसेसाठीही सांगितले
प्रश्नकर्ता: परंतु रात्री भोजन का करु नये ?
दादाश्री : सूर्याच्या हजेरीत संध्याकाळचे जेवण करावे. असे जैनमत आहे आणि वेदांतातही असे सांगितले आहे. जोपर्यंत सूर्याची उपस्थिती असते तोपर्यंत आत पाकळी उघडी असते म्हणून त्यावेळी जेवून घ्यावे, असे वेदांतात सांगितले आहे. म्हणजे तुम्ही जर रात्री आहार घेतला तर काय नुकसान होईल ? तर ते कमळ बंद झाल्यामुळे रात्री अन्नपचन लवकर होतच नाही. शिवाय दुसरे काय नुकसान होईल ते या तीर्थंकरांनी सांगितले की रात्री सूर्यास्त झाल्यानंतर जे जीवजंतु फिरत असतात ते सर्व जीव आपापल्या घरी परततात. कावळे, कुत्रे, कबुतर, नंतर आकाशातील जीव, सर्व घरी परततात, आपापल्या घरट्याकडे प्रयाण करतात. अंधार होण्याच्या आत घरात शिरतात. पुष्कळ वेळा आकाशात जबरदस्त ढग असतात अशावेळी सूर्य मावळला की नाही नाही हे समजत नाही. पण जेव्हा हे जीव घरट्याकडे परततात तेव्हा समजावे की आत्ता सूर्यनारायण मावळला. ते जीव त्यांच्या आंतरिक शक्तीने समजू शकतात. आता त्यावेळी लहानात लहान जीव सुद्धा घरात शिरतात आणि अतिशय सूक्ष्म जीव की, जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, दुर्बिणीनेही पाहू शकत नाही, असे जीव सुद्धा घरात शिरतात. आत शिरल्यावर जिथे अन्न असेल त्यावर बसतात. आपल्या लक्षातही येत नाही की ते आत बसलेले आहेत, कारण त्यांचा रंगच असा असतो की ते जर भातावर बसले तर भाताच्याच रंगाचे दिसतील. भाकरीवर बसले तर भाकरीसारखे आणि पोळीवर बसले तर पोळीसारखेच दिसतील. म्हणून रात्री हे अन्न खाऊ नये.
रात्रीभोजन करु नये, तरीही लोक करतात. आणि कित्येक लोकांना तर हे माहीतही नाही की रात्रीभोजनाने काय नुकसान होते. आणि ज्यांना