________________
अहिंसा
संख्या खूप वाढते. तर त्यांचे मांस खाणे चांगले. त्याहून पुढे जर कोणी म्हणेल की, 'आम्हाला प्रगती करायची आहे.' तर तेव्हा हे मांस खाणेही नुकसानकारक आहे. त्यापेक्षा तू अंडे खा. मांस खाऊ नकोस. आता याहून पुढे जायचे असेल तर त्याला म्हणेन की, 'तू कंदमूळ खा.' याहून पुढे जायचे असेल तर त्याला आम्ही सांगू, 'या कंदमूळाशिवाय वरणभात, पोळी, लाडू, तूप, गुळ हे सर्व खा.' आणि याहीपेक्षा पुढची प्रगती करायची असेल तर आपण सांगू की, 'हे सहा वीगई आहेत, जसेकी गुळ, तूप, मध, दही, लोणी इत्यादी, हे सर्व खाणे बंद कर आणि वरणभात, भाजी पोळी खा.' यानंतर बाकी काही उरत नाही.
याप्रमाणे आहाराचे प्रकार आहेत. यात ज्याला जो प्रकार आवडेल तो त्याने घ्यावा. हे सर्व मार्ग दाखवले आहेत. याप्रमाणे आहाराचे वर्णन आहे. आणि हे वर्णन समजण्यासाठी आहे करण्यासाठी नाही. भगवंताने आहारात असे भेद का पाडले? तर त्यामुळे आवरण तुटावे म्हणून. या मार्गाने चाललात तर आतील आवरणे तुटत जातील.
विज्ञान, रात्रीभोजनाचे प्रश्नकर्ता : रात्री भोजनाविषयी काही मार्गदर्शन द्या. जैन लोकात त्याचा निषेध आहे.
दादाश्री : जर रात्रीभोजन केले नाही तर ते सर्वात उत्तम आहे. ही चांगली दृष्टी आहे. धर्माशी याचे काही देणेघेणे नाही, तरीही यास धर्मात समाविष्ट केले, याचे काय कारण असेल? की जेवढी शरीराची शुद्धी असेल तेवढी धर्मात प्रगती करता येते. या कारणाने धर्मात समाविष्ट केले. बाकी, धर्मात याची काही गरज नाही. परंतु शरीराच्या शुद्धीसाठी ही सर्वात चांगली वस्तू आहे.
प्रश्नकर्ता : मग वीतरागांनी लोकांना रात्रीभोजन करू नये असे जे सांगतिले ते पाप-पुण्यासाठी होते की, शारीरिक स्वास्थ्यासाठी होते?