________________
अहिंसा
४३
म्हणून एकेंद्रियात हात घालू नका. एकेंद्रिय जीवात तुम्ही हात घातला तर तुम्ही इगोईजमवाले आहात, अहंकारी आहात. एकेंद्रिय जीव हे त्रस जीव (ज्यांना त्रास होतो, असे जीव) नाहीत, तेव्हा एकेन्द्रिय जीवांसाठी विकल्प करण्याची तुम्हाला गरज नाही. कारण हा तर व्यवहारच आहे. खावे-प्यावे लागेल, सर्व करावे लागेल. ____ बाकी, संपूर्ण जग हे जीवजंतुच आहे. एकेंद्रिय जीवांचे तर सर्व हे जीवनच आहे. जीवाशिवाय या जगात दुसरे काहीच नाही. आणि निर्जिव वस्तू खाऊ शकतच नाही. म्हणून जीव असणारी वस्तूच खावी लागते, त्यानेच शरीराला पोषण मिळते. आणि एकेंद्रिय जीव आहे त्यामुळे त्यात रक्त, पू, मांस नाही, म्हणून एकेंद्रिय जीव खाण्याची तुम्हाला सुट दिली आहे. मग यात जर तुम्ही इतकी चिंता करत बसाल तर कधी पार येईल? त्या जीवांची चिंता करायचीच नाही. खरोखर ज्याची चिंता करायला पाहिजे ते राहूनच गेले आणि ज्याची चिंता करण्याची गरज नाही त्याच्या चिंतेत पडले. या अशा बारीक हिंसेची चिंता करण्याची गरजच नाही.
कोणता आहार उत्तम?
प्रश्नकर्ता : क्रमिक मार्गात काही ठराविक प्रकारचा आहार खाण्यास का मनाई केली आहे ?
दादाश्री : असे आहे, आहाराचे प्रकार आहेत. त्यात मनुष्याला अत्यंत अहितकारी आहार, की ज्यापेक्षा जास्त अहितकारी दुसरे काहीच नाही, असे अंतिम प्रकारचे अहितकारी म्हणजे मनुष्याचे मांस खाणे. आता यापेक्षा चांगले कोणते? ज्या प्राण्यांची पिल्ले अधिक प्रमाणात वाढत असतील त्या प्राण्यांचे मांस खाणे ते चांगले, म्हणजे या कोंबडया, बदके यांची प्रजोत्यत्ती जास्त असल्यामुळे पिल्ल्यांची संख्या वाढते. या गाई-म्हशींच्या पिल्लांची संख्या कमी प्रमाणात वाढते. या माश्यांची