________________
अहिंसा
थोडी-फार कमी पण त्यांचीही काळजी घ्या. त्यांना दुःख होणार नाही अशी काळजी घ्यावी. इथपर्यंत जपायचे. मनुष्य व्यतिरिक्त पंचेन्द्रिय जीवांना जपायचे पण ते दुसऱ्या क्रमांकावर. नंतर तिसऱ्या क्रमांकावर कोण येतात ? दोन इंद्रियांच्या वरील जीवांना सांभाळायचे.
४२
आहारात सर्वात उच्च प्रकरचा आहार कोणता ? तर एकेन्द्रिय जीवांचा! ज्यांना मोक्ष प्राप्त करायचा आहे त्यांना दोन इंद्रियांपेक्षा वरील जीवांचा आहारासाठी उपयोग करण्याचा अधिकार नाही. अर्थात दोन इंद्रियांपेक्षा जास्त इंद्रिय असलेल्या जीवांची जोखीम आपण पत्करु नये. कारण जितकी त्यांची इंद्रिय, तितक्या प्रमाणात पुण्याची गरज असते, तेवढे माणसाचे पुण्य वापरले जाते !
मनुष्याला आहार घेतल्याशिवाय सुटकाच नाही आणि त्या जीवांचे नुकसान मनुष्याला अवश्य होतेच. एकेन्द्रिय जीवच आपला आहार आहे. त्यांचा आपण आहार म्हणून उपयोग करतो म्हणून ते भोज्य आणि आपण भोक्ता आहोत आणि तोपर्यंत आपल्यावर जबाबदारी येते. पण भगवंताने ही सूट दिली आहे. कारण तुम्ही महान शिल्लक (पुण्य) वाले आहात आणि तुम्ही त्या जीवांचा नाश करता. पण तुम्ही त्या जीवांना खाता त्यात त्या जीवांचा काय फायदा आहे ? त्या जीवांना खाल्ल्याने त्यांचा नाश तर होतोच. पण यात असे आहे, की त्या जीवांना आहार म्हणून तुम्ही खाल्ले म्हणून तुम्हाला त्याचा दंड लागतो. पण ते खाऊनही तुम्ही जास्त नफा कमावता. पूर्ण दिवस जगले आणि धर्म केला तर तुम्ही शंभराची कमाई करता. त्यातील दहाचा दंड तुम्हाला त्यांना चुकवावा लागतो. म्हणजे तुमच्याजवळ नव्वद शिल्लक राहतात. आणि तुमच्या कमाईतून दहा त्यांना मिळाल्याने त्यांची उर्ध्वगती होते. म्हणजे ही तर निसर्गाच्या नियमाच्या आधारावरच उर्ध्वगती होत आहे. ते एकेंद्रियातून दोन इंद्रियात येतात. म्हणजे अशाप्रकारे हे क्रमाक्रमाने वाढतच चालले आहे. या मनुष्यांच्या फायद्यातून ते जीव फायदा मिळवतात. अशा प्रकारे सर्वांचा हिशोब चुकता होत राहतो. असे सायन्स लोकांना समजत नाही ना!