________________
अहिंसा
४१
दादाश्री : तेव्हा तुम्ही इतके समजून घ्यावे की आपण त्याला नालायक म्हटले तर त्याला दुःख होईल. ही पण हिंसाच आहे, म्हणून आपण असे बोलू नये. अहिंसा पाळायची असेल तर हिंसेसाठी खूप सावधानता बाळगली पाहिजे. जे बोलल्याने आपल्याला दुःख होते तसे आपण दुसऱ्यांना बोलू नये.
नंतर मनात खराब विचार सुद्धा यायला नको. कोणाकडून फुकटचे मिळवायचे, हिसकावून घ्यायचे, असे विचारही यायला नकोत. खूप पैसे जमा करण्याचे विचार पण येता कामा नये. कारण शास्त्रकारांनी काय म्हटले आहे की, या जन्मात तुझ्या हिशोबात जेवढे पैसे आहेत, तेवढे तर तुला मिळतच राहणार आहेत. तेव्हा खूप पैसे जमा करू असा विचार करण्याची तुला गरजच नाही. असा विचार करशील तर याचा अर्थ हिंसा करणे असा होतो. कारण दुसऱ्यांचे पैसे हडपणे, म्हणजेच दुसऱ्यांचा कोटा आपण मिळवणे, अशी जी इच्छा होते, त्यात पण हिंसाच सामावलेली आहे. म्हणून असे भाव करू नये.
प्रश्नकर्ता : बस, हे तीनच उपाय आहेत का अहिंसेचे ?
दादाश्री : अजूनही दुसरे आहेत, नंतर मांसाहार, अंडे कधीही खाऊ नये. नंतर बटाटे, कांदे, लसूण यांचा वापर करू नये. नाईलाज असेल तरीही घेऊ नये. कारण कांदे, लसूण हिंसक असल्यामुळे माणसाला क्रोधी बनवतात आणि क्रोध केला म्हणजे समोरच्याला दुःख होते. दुसऱ्या ज्या भाज्या तुम्हाला खायच्या असतील त्या तुम्ही खाऊ शकता.
आधी मोठ्या जीवांना वाचवा
आता भगवंत काय सांगू इच्छितात की सर्वात प्रथम तुम्ही माणसांना जपा. हो, आपल्या मन-वचन-कायेने किंचितमात्र पण दुःख होणार नाही, एवढी बाऊन्ड्री (सीमा) लक्षात ठेवा. नंतर पंचेन्द्रिय जीव गाई, म्हशी, कोंबडी, बोकड, यांचीही हिंसा करू नका. भले मनुष्यापेक्षा