________________
४०
अहिंसा
सिध्दी, अहिंसेची
प्रश्नकर्ता : तर आता अहिंसा कशी काय सिद्ध होईल ?
दादाश्री : अहिंसा ? ओहोहो ! ही अहिंसा सिद्ध झाली तर मनुष्य देवच होईल! सद्या तुम्ही थोडीफार अहिंसा पाळता का ?
प्रश्नकर्ता : साधारण, जास्त नाही.
दादाश्री : मग जरा जास्त पाळण्याचे ठरवा ना! अरे, अहिंसा सिद्ध होण्याच्या गोष्टी कशाला करता ? अहिंसा सिद्ध झाली म्हणजे मनुष्य देवच झाला !
प्रश्नकर्ता : अहिंसा पाळण्याचा उपाय सांगा.
दादाश्री : एक तर, ज्या जीवांना आपल्याकडून त्रास होतो, त्यांना दुःख देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. आणि गहू, बाजरी, तांदुळ वगैरे सर्व खाऊ शकता. त्यास हरकत नाही. त्यांना आपल्याकडून त्रास होत नाही, ते बेशुध्दावस्थेत आहेत. आणि या किड्या मुंग्यांना त्रास होतो म्हणून ते पळतात, तेव्हा त्यांना मारू नये. हे शंख शिंपल्याचे जे जीव आहेत की जे हालचाल करणारे जीव आहेत, अशा दोन इंद्रियांपासून ते पाच इंद्रियांपर्यंतच्या जीवांना मारु नये. ढेकणालाही तुम्ही पकडले तर त्याला त्रास होतो. म्हणून तुम्ही त्यांना मारू नका. समजले का ?
प्रश्नकर्ता : हो, समजले.
दादाश्री : हो. दुसरे म्हणजे सूर्यनारायण मावळल्यानंतर जेवण करू नका. आता तिसरे, अहिंसेत जीभेवर खूप कंट्रोल ठेवावा लागतो. तुम्हाला कोणी म्हटले की तुम्ही नालायक आहात, हे ऐकून तुम्हाला सुख वाटते की दुःख ?
प्रश्नकर्ता: दु:ख वाटते.