________________
अहिंसा
लोकांनी सांगितलेले तुम्ही मानून घेतले आहे. बाकी, ही गोष्ट सहज समजेल अशी नाही. आजचे मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा समजू शकणार नाहीत! कारण ही अतिशय गुह्य गोष्ट आहे. हे फक्त ज्ञानी स्वतः समजू शकतात. परंतु तुम्हाला जरी विस्तारपूर्वक समजावले तरी तुम्हाला समजणार नाही, अशी ही गोष्ट आहे. हे जे पाच एकेंद्रिय जीव आहेत ना, यात फक्त वनस्पतिकाय हे एकच तुम्ही समजू शकाल. बाकी वायुकाय, तेउकाय, जलकाय आणि पृथ्वीकाय या चार जीवांना समजण्यासाठी खूप उच्च लेवल (श्रेणी) पाहिजे.
प्रश्नकर्ता : सायन्टिस्ट यावरच संशोधन करीत आहेत ना !
३९
दादाश्री : पण सायन्टिस्ट समजू शकणार नाहीत. फक्त या झाडांविषयीचेच समजू शकतील. तेही फारसे नाही. काही अंशीच समजू शकतील.
असे आहे, हे मी तुम्हाला भगवंताच्या भाषेत सांगतो. ही झाडपाने जी उघड्या डोळ्यांनी दिसतात, ते वनस्पतिकाय आहे. या झाडात सुद्धा जीव आहे. मग हे वायुकाय, म्हणजे या वायुतही जीव आहेत, त्यांना वायुकाय जीव म्हटले. नंतर ही माती आहे ना, तिच्या आत जीव सुद्धा आहे आणि माती सुद्धा आहे. या हिमालयात माती आहे, दगड आहे, या सर्वात जीव आहे. दगड सुद्धा जिवंत असतात, त्यांना पृथ्वीकाय जीव म्हटले आहे. या आगीच्या ज्वाळा उठतात त्यावेळी त्या कोळशात अग्नि नसतो. ते तेउकाय जीव त्या ज्वाळात जमा होऊन जातात. ते तेउकाय जीव आहेत. हे पाणी पितात, ते तर निव्वळ जीवाणूंपासूनच बनले आहे. हो, जीव आणि त्याचा देह - दोन्ही एकत्र झाल्याने हे पाणी आहे. त्यास भगवंताने अपकाय जीव म्हटले आहे. ज्यांचे पाणीरूपी शरीर आहे, असे कितीतरी जीव जमा होतात तेव्हा एक ग्लास पाणी तयार होते. आता पाणी हे जीव, अन्न हे जीव, हवा हेही जीव, हे सर्व निव्वळ जीवच आहेत.