________________
३८
अहिंसा
तीस वर्षांपर्यंत ते परिग्रही होते. मग भगवंतानी असे काय पाहिले की, स्त्रीचा (पत्नीचा) परिग्रह त्या जन्मात असेल आणि त्याच जन्मात मोक्षालाही जाता येईल. मग त्यांनी असे काय शोधून काढले? म्हणजे ही अंतिम श्रेणीची गोष्ट आहे.
म्हणजे देवाच्या मूर्तीलाही फुले वाहू शकतो आणि आपल्या तीर्थंकरांच्या मूर्तीलाही फुले वाहू शकतो. तसे तर हा पुष्प पाकळीलाही दुखावत नाही आणि पाहायला गेले तर जवळच्यांशी कषाय करुन करुन त्यांचा दम काढून टाकतो. फुलाची पाकळी पण दुखावत नाही असा मनुष्य जर कुत्रे झोपले असेल त्याच्या जवळहून निघाला तरी कुत्र्याला जाग येणार नाही, असे असते.
फुलाची पाकळी सुद्धा दुखावणार नाही हे तर शेवटच्या जन्मात, मोक्ष प्राप्त करण्यासाठी शेवटची पंधरा वर्षे बाकी असतील तेव्हाच बंद करायचे असते. म्हणून अखेरच्या पंधरा वर्षात हे सर्व बंद करायचे असते. आणि जेव्हापासून स्त्रीचा सहवास सोडतो त्यानंतर आपणहून फूल वगैरे सर्व सोडून द्यावे. आणि ते तर आपोआपच बंद होत असते. तोपर्यंत व्यवहारात कसलीही ढवळाढवळ करू नये.
एकेंद्रिय जीवांची सृष्टी प्रश्नकर्ता : हे अपकाय, तेउकाय, पृथ्वीकाय, वायुकाय, वनस्पतिकाय हे सर्व काय आहे ?
दादाश्री : हे सारे एकेंद्रिय जीव आहेत.
प्रश्नकर्ता : पाण्यात जीव आहे हे आमच्या श्रद्धेत बसले आहे म्हणून आम्ही पाणी उकळून पितो.
दादाश्री : माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की, पाण्यातील जीवांबद्दल तुम्ही जे समजले आहात आणि जे सांगत आहात, ते तर