________________
अहिंसा
३५
गोवर्धन त्यांनी खूप सुंदर रित्या केले होते. कारण त्या काळी हिंसेचे प्रमाण खूप वाढले होते. हिंसा जबरदस्त वाढली होती. फक्त मुस्लिम लोकच हिंसा करतात असे नाही. हिंदु लोकांतही अमुक उच्च क्वॉलिटीचे लोकच हिंसा करत नाहीत, बाकीची सर्व जनता हिंसा करणारी आहे.
हिंसक भाव तर नसावाच! माणसात अहिंसक भाव तर असलाच पाहिजे ना! अहिंसेसाठी जीवन व्यतीत करणे, याला अहिंसक भाव म्हटले जाते.
पुजेच्या पुष्पात पाप आहे का? प्रश्नकर्ता : मंदिरात पूजा करण्यासाठी फुले वाहिली जातात, त्यात पाप आहे की नाही?
दादाश्री : मंदिरात पूजा करताना फुले वाहिली जातात हे दुसऱ्या दृष्टीकोणाने पाहायचे आहे. फुले तोडणे हा गुन्हा आहे. फुले विकत घेणे हा सुद्धा गुन्हा आहे. पण दुसऱ्या दृष्टीने पाहिल्याने त्यात लाभ आहे. कोणत्या दृष्टीने हे मी तुम्हाला समजावतो.
आज कित्येक लोक मानतात की फुले वापरण्यात महादोष आहे आणि कित्येक लोक फुले देवाला वाहतात. तर आता यात खरी हकीगत काय आहे ? हा वीतरागांचा जो मार्ग आहे तो लाभालाभाचा मार्ग आहे. गुलाबाची दोन फुले तोडून आणली, त्यात त्याने हिंसा तर केली. कारण ती फुले त्याच्या जागेवरून तोडली म्हणून हिंसा तर झालीच. पण ती फुले तो स्वतःसाठी वापरत नाही. ती फुले तो देवाला वाहतो किंवा ज्ञानी पुरुषांना वाहतो, ती द्रव्यपूजा झाली असे म्हटले जाईल. आता ही हिंसा केल्याबद्दल पाच टक्के दंड करा, आणि देवाला फूल वाहिले म्हणून चाळीस टक्के प्रॉफीट द्या. किंवा मग ज्ञानी पुरुषांना वाहिली म्हणून तीस टक्के प्रॉफीट द्या. तरी देखील पंचवीस टक्के वाचले ना,