________________
३४
अहिंसा
समजावण्यात आले आणि सक्तीने नाही पण स्वतःच्या मर्जीने लोकांना समजावून प्रत्येक गावात गाई पाळण्याची प्रथा करण्यात आली तर गाईंची संख्या पुष्कळ वाढेल. पूर्वी सगळीकडे गौशाळा ठेवत होते, तिथे हजारहजार गाई पाळत असत. म्हणजे गाईंची संख्या वाढवण्याची गरज आहे. आता तर गाईंची संख्या वाढत नाही आणि दुसरीकडे हे असे सर्व चालले आहे. पण आपण कुणालाही नाही म्हणू शकत नाही! नाही म्हटले तर गुन्हा मानला जाईल. आणि कोणी चुकीचे थोडेच करत आहे? वाचवतच आहेत ना!
प्रश्नकर्ता : आम्ही गाईंना सोडवत नाही, परंतु येणाऱ्या गाईंना थांबवतो.
दादाश्री : हो, येणाऱ्यांना थांबवा. त्यांच्या मूळ मालकांना समजवा की असे करू नका. सध्या तर तुम्ही गोवर्धन आणि गौरक्षा, आधी हे दोन नियम पाळा. इतर सर्व नंतर, सेकंडरी! हे कार्य पूर्ण झाल्यानंतर मग दुसरे.
म्हणून गोवर्धन आणि गोरक्षा, या दोन्ही गोष्टींना कृष्ण भगवंतानी विशेष महत्त्व दिले होते. गोवर्धन करणारे म्हणजे गोप आणि गोपी. गोप म्हणजे गोपालन करणारे!
प्रश्नकर्ता : गोवर्धन, ही नवीनच गोष्ट ऐकायला मिळाली.
दादाश्री : हो. या सर्व गोष्टी आहेतच. पण जर यांचे विवरण झाले तर कामाचे. बाकी, सर्व गोष्टी तर असतातच आणि त्या खऱ्याही असतात. परंतु लोक त्यास स्थूल रुपात समजले. म्हणे, 'गोवर्धन पर्वत उचलला.' म्हणून मग ते फॉरेनचे सायन्टिस्ट म्हणतील, 'या गोष्टीत काही तथ्य नाही, पर्वत कोणी उचलू शकतो का?' आणि जर उचललाच तर हिमालय का उचलला नाही? आणि मग बाण लागताच कसे मरण आले? परंतु हे असे नसते.