________________
अहिंसा
३३
कृष्णाचे गोवर्धन - गाईंचे वर्धन
कृष्ण भगवंतांच्या काळात हिंसा खूपच वाढली होती. म्हणून कृष्ण भगवंताने काय केले ? गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलला, आता हा गोवर्धन पर्वत बोटावर उचलला हे शब्द तर स्थूलातच राहिले. लोक त्यामागील सूक्ष्म भाषा समजलेच नाहीत. गोवर्धन म्हणजे गाईंचे संवर्धन कसे करता येईल यासाठी ठिकठिकाणी आयोजन केले, आणि गोरक्षेचेही आयोजन केले. संवर्धन आणि रक्षण दोन्हींचे आयोजन केले. कारण हिंदुस्तानातील लोकांचे मुख्य जीवनच यावर अवलंबून आहे. म्हणून जेव्हा हिंसा अतिशय वाढते तेव्हा दुसरे सर्व सोडून आधी यांना सांभाळा. आणि जे हिंसक प्राणी आहेत, त्यांच्यासाठी तर आपल्याला काही करण्याची गरज नाही. ते प्राणी स्वत:च हिंसक आहेत. त्यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. त्यांना कोणी मारतही नाही आणि त्यांना कोणी खाऊ पण शकत नाही ना ! या मांजराला कोण खाणार ? कुत्र्याला कोण खाणार? कोणी खात नाही आणि कोणी खाऊ शकणारही नाही. म्हणून फक्त हे एकच, गोवर्धन आणि गोरक्षा, या दोन गोष्टींचीच काळजी घेण्यासारखे आहे.
गोवर्धनासाठी खूप उपाय केले पाहिजे. कृष्ण भगवंताने एका बोटावर गोवर्धन केले ना, ती खूप उच्च प्रकारची गोष्ट केली होती. त्यांनी ठिकठिकाणी गोवर्धनाची स्थापना केली होती आणि गौशाळा चालवल्या होत्या. हजारो गाईंचे पोषण होईल असे आयोजन केले होते. गोवर्धन आणि गोरक्षा, या दोन्हींची स्थापना केली. रक्षा केली म्हणून हिंसा थांबली. आणि त्यामुळे मग ठिकठिकाणी दूध-तूप वगैरे सर्व पदार्थ मिळू लागते ना! म्हणून गाई वाचवण्यापेक्षा गाईंची संख्या कशी वाढवता येईल यासाठी खूप काही करण्याची गरज आहे.
गाई पाळल्याने इतके फायदे आहेत, गाईच्या दुधाचे अनेक फायदे आहेत, गाईच्या तुपाचे अनेक फायदे आहेत, हे सर्व उघड करून