________________
३६
अहिंसा
म्हणून लाभालाभाच्या व्यापारासाठी हे जग आहे. लाभालाभाचा व्यापार केला पाहिजे. आणि जर त्यात लाभ कमी होत असेल व नुकसान जास्त होत असेल तर मात्र ते बंद करा. पण इथे तर नुकसानापेक्षा लाभ जास्त होत आहे. पण तू फुले वाहिलीच नाही, तर तुझा व्यापार बंदच झाला समज.
फुलांची पाकळी जिथे दुखावते... प्रश्नकर्ता : आतापर्यंत जी फुले तोडली असतील, तर त्याचे काही दोष, पाप लागले असेल का?
दादाश्री : अरे, फुले एक हजार वर्षे तोडली, आणि एक आयुष्य लोकांशी किंवा घरात कषाय केले, तर फूल तोडण्याच्या दोषापेक्षाही हा कषायाचा दोष जास्त लागतो. म्हणून देवाने आधी कषाय बंद करण्यास सांगितले. फुलांची तर काही हरकत नाही. पण तरीही विनाकारण फुले तोडू नये. आवश्यकता असेल, म्हणजे देवाला वाहण्यासाठी तोडली तर हरकत नाही. हौसेसाठी तोडू नये.
प्रश्नकर्ता : पण असे म्हटले आहे ना की 'पुष्प पांखडी ज्यां दुभाय, जिनवरनी नही त्यां आज्ञा.' (फुलांची पाकळी जिथे दुखावली जात असेल तिथे जिनवरांची आज्ञा नाही.)
दादाश्री : हे तर कृपाळूदेवाने म्हटले आहे. तीर्थंकरांनी लिहिले होते, ते तीर्थंकरांचे शब्द कृपाळूदेवाने लिहिले आहेत.पण ते कोणासाठी? तर ज्याला या संसारातील कुठलीही वस्तू नको असेल अशा श्रेणीपर्यंत पोहोचला असेल त्याच्यासाठी! आणि तुम्हाला तर अजून हा शर्ट घालायचा आहे ना?
प्रश्नकर्ता : तोही इस्त्री केलेला! दादाश्री : हो, आणि तोही इस्त्री केलेला! म्हणजे या संसारातील