________________
अहिंसा
देऊन मोठ्या हिंसेप्रति उदासीनता ठेवण्यात आली तर ते उचित म्हटले जाईल का?
दादाश्री : ते उचित म्हटले जाणार नाही. त्याचा विरोध असायलाच हवा. विरोध नसेल तर तुम्ही त्याचे अनुमोदन करता, दोन्हींपैकी एका जागेवर (सहमत) आहात. जर विरोध नसेल तर अनुमोदन करत आहात. मग तो कोणीही असो, किंवा ज्ञानी असो, पण त्याला विरोध दर्शविण्याची गरज आहे. नाही तर तुम्ही अनुमोदनेकडे वळाल.
प्रश्नकर्ता : हिंसा करणारा कोणताही पशु-पक्षी असो किंवा इतर कोणीही असो, जर त्यांच्या उदयातच हिंसा आली असेल, तर त्यास थांबवण्यासाठी आपण निमित्त बनू शकतो का?
दादाश्री : कोणाच्याही उदयात ते आलेले असेल आणि तुम्ही ते थांबवण्यासाठी निमित्त झाला नाहीत तर तुम्ही त्या हिंसेचे अनुमोदन केल्यासारखे होईल. म्हणून तुम्ही ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचा वाटेल तो उदय असेल पण तुम्ही तो थांबवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
जसे रस्त्याने कोणी जात असेल त्याच्या कर्माच्या उदयाने तो पडला व त्याच्या पायाला दुखापत झाली, आणि तुम्ही तिथून जात असाल, तर तुम्ही गाडीतून खाली उतरुन स्वत:च्या कपड्याने त्याच्या पायाला पट्टी बांधावी. आणि त्याला गाडीत बसवून घरी सोडून आले पाहिजे. भलेही ते त्याच्या कर्माच्या उदयाने झाले असेल, पण आपण भावना दाखवली पाहिजे. नाही तर तुम्ही त्याच्या विरोधी भावनेने बांधले जाल आणि मुक्त होऊ शकणार नाही. हे जग आपल्याला मुक्त करेल असे नाही.
प्रश्नकर्ता : अध्यात्म्यात रुची असणाऱ्यांसाठी हिंसा थांबण्याचा प्रयत्न करणे हे गरजेचे आहे का? जर गरजेचे असेल तर आपण त्याविषयी मार्गदर्शन, उपदेश किंवा सल्ला द्याल का?